...अन्यथा पॅंथर स्टाईलने येवला रेल्वे स्थानकाचे नामांतर ; दीपक केदार यांचा इशारा

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

...अन्यथा पॅंथर स्टाईलने येवला रेल्वे स्थानकाचे नामांतर ; दीपक केदार यांचा इशारा

 

 ...अन्यथा पॅंथर स्टाईलने येवला रेल्वे स्थानकाचे नामांतर ;  दीपक केदार यांचा इशारा

Social24Network

येवला रेल्वे स्थानकाचे नामांतर ‘‘मुक्ती भूमी’’ करण्यात यावे या मागणीचे निवेदन आज आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी येवला रेल्वे स्थानकाचे डीआरएम यांना दिले. तात्काळ या प्रकरणी राज्य व केंद्र सरकारने निर्णय न घेतल्यास पॅंथर स्टाईलने रेल्वे स्थानकाचे नामांतर केल्या जाईल असा इशारा यावेळी केदार यांनी दिला आहे. 

येवला ही ऐतिहासिक भूमी आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला मानव मुक्तीचा लढ्याला या भूमीतुन सुरूवात झाली आहे. बौद्ध धम्म दीक्षा घेण्याचा ऐतिहासिक निर्णय या भूमीवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. त्यामुळे देशभरामध्ये ही भूमी ‘‘मुक्ती भूमी’’ या नावाने प्रसिद्ध आहे. गेल्या १५ वर्षापासून आंबेडकरी चळवळीतील पक्ष, संघटना येवला रेल्वे स्थानकाचे नामांतर ‘‘मुक्ती भूमी’’ असे करण्यात अशी मागणी करीत आहेत. परंतु सरकार आणि रेल्वे खाते जातीय मानसिकतेतून, मनुवादी मानसिकतेतून या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. केंद्र सरकारने तात्काळ ही मागणी मान्य न झाल्यास पॅंथर स्टाईलने येवला रेल्वे स्थानकाचे नामांतर करू असा इशारा आँल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी यावेळी दिला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या