फुले-आंबेडकरी विचारवंत प्रा. भारत सिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी अमरावतीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांचा लेख...
आंबेडकरी चळवळीला बऱ्याच त्यागी, निष्ठावंत, समर्पित कार्यकर्त्यांचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या त्यागातून चळवळ समृद्ध झालेली आम्ही पाहतोय.. हा चळवळीचा समृद्ध वृक्ष मोठा होण्यासाठी ज्यांनी आपल्या श्रमाच, कष्टाचं, विचारांच, त्याग आणि समर्पणाच सिंचन करून आंबेडकरी चळवळीला सुगीचे दिवस आणण्यासाठी जे आजतागायत झिजत आहेत ते चळवळीतील कार्यकर्त्यांचं उर्जावान विद्यापीठ म्हणजे प्रा. भारत सिरसाट सर...!
आज प्रा. भारत सिरसाट सरांचा वाढदिवस. निमित्ताने त्यांना कोटी कोटी मंगल कामना.. सरांना त्यांच्या बद्दलची स्तुती, बडेजावपणा मुळीच आवडत नाही. आणि त्यांचे व्यक्तीमत्व सुद्धा एका पानात समावणारे नाहीच. तरीही त्यांच्या व्यक्तीमत्वाचा वेध घेण्याचा छोटासा हा प्रयत्न.. चळवळीला आपलं देणं लागत या भावनेतून चळवळीसाठी जे जे करता येईल ते मनापासून पूर्णपणे करण्याचा ध्यास घेतलेलं धेय्यनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. सिरसाट सर... कुठल्याही अपेक्षेविना, कुठल्याही बाबीची लालसा न बाळगता प्रामाणिकपणे चळवळ मोठी करण्यासाठी आपण काम करत राहायचं ही बाब सिरसाट सरांपासून शिकण्यासारखी आहे.
आंबेकडरी घराण्याबाबत अनेक चुकीचे समज, गैरसमज आजही समाजात आहेत. ते चुकीचे समज पुसून काढत आंबेडकरी घराण्याचा खरा इतिहास संपुर्ण महाराष्ट्र भरात मांडण्याचे काम सुर्यपूत्र भय्यासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून करताना प्रा. सिरसाट सरांना आम्ही पाहतो आहे. त्यांनी आपल्या साहित्य संपदेच्या माध्यमातून लिखित स्वरूपात सुद्धा भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर कुटुंबाबाबतचा सत्य इतिहास जगासमोर आणून आंबेडकर विरोधकांचा बुरखा फाडला आहे. सोबतच रमाई प्रकाशन उभे करून रमाई मासिक नियमितपणे चालवत अनेक पुस्तकांच्या माध्यमातून विचारांची आदरांजली आई रमाईला अर्पण करताना प्रा. रेखाताई व प्रा. भारत सर श्रम घेताना कधीही थकत नाही हे विशेष.

प्रा. सिरसाट सर श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रचंड आणि कट्टर समर्थक आहे. भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी प्रणित फुले, आंबेडकर विद्वत सभेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदांवर सरांनी काम केलं आहे. अनेकदा बोलताना सर म्हणतात की, मला पक्षाचे कुठलेही पद नको आहे, कुठलंही आमदारकी/ खासदारकीच पद नको आहे. आपल्याला फक्त हा चळवळीचा काफीला मजबूत ठेवायचा आहे.एवढी चळवळी विषयी स्पष्ट निष्ठा असणारा एक समर्पित कार्यकर्ता मी सिरसाट सरांच्या रूपाने अनुभवला आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाची धुरा प्रा. सरांच्या खांद्यावर एक विद्रोही विचारवंत कार्यकर्ता म्हणून होतीच. परंतू आपण लेखक, साहित्यिक, विचारवंत, प्रकाशक किंवा आणखी काही असल्याचा कुठेच भास न होऊ देता सकाळ पासून ते दुसऱ्या दिवसाच्या पहाटेच्या 3 वाजेपर्यंत अविरत काम करून मंडपातील सोप्यावरच थोडीफार झोप घेतलेले सिरसाट सर मी त्यानिमित्ताने पाहलेत. खर तर त्या विद्रोही साहित्य संमेलनाची यशस्वीता सिरसाट सरांच्या विद्रोही हाताच्या श्रमविना शक्यच नव्हती अस म्हटल्यास वागावे ठरणार नाही. 3 दिवस चाललेल्या साहित्य संमेलना दरम्यान काही जण भव्य स्टेज वरून खालीच उतरायचे नाव घेत नव्हते व सगळ्यांची फोटो काढण्यासाठीची धावपळ व इकडे सिरसाट सर मात्र साहित्य संमेलनाचे बारीक सारिक काम करताना 3 दिवसातून फक्त एकदा निरंजन टकले यांच्या व्याख्याना दरम्यान कुणीतरी आग्रह केला म्हणून स्टेज वर बसताना आम्ही पाहलेत. विद्रोहीच्या निमित्ताने माझ्यासारख्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला सूत्रसंचालनाची संधी देऊन मला बळ देणारे प्रा. भारत सिरसाट म्हणजे कार्यकर्त्यांचा आधारवडच म्हणावे लागेल.
कितीही मोठा माणूस असो, कुणाच्याही मागे पुढे न करता खोट्या विचारांचे व माणसांचे लांगुलचालन न करता जे खर आहे ते स्पष्टपणे व निर्भीडपणे बोलणारे आणि मांडणारे आंबेडकरी चळवळीतील दबंग व्यक्तीमत्व म्हणून प्रा. भारत सिरसाट सरांचा नामोल्लेख करावाच लागेल. कारण कुठल्याही परिणामाची चिंता न करता आपल्या भूमिकेपासून तसुभर सुद्धा न ढळता तरुणांच्या ताकदीने काम करणारे सिरसाट सर आम्हा कार्यकर्त्यांचे ऊर्जावान विद्यापीठच आहे. सरांच्या सहवासातून चळवळ जगायला व शिकायला मिळत हीच विद्यापीठाची अनमोल देणं आहे. आज सरांच्या वाढदिवस निमित्ताने त्यांना कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या घडवण्यासाठी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच तथागतचरणी मंगल कामना करतो..
जय भिम...!
- सागर भवते
वरखेड, ता. तिवसा जि. अमरावती
मो. 9850528687

.jpeg)


0 टिप्पण्या