मराठी साहित्य वार्ता ‘काव्यसंवाद’ कार्यक्रम येत्या रविवार पासून लाईव्ह

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी साहित्य वार्ता ‘काव्यसंवाद’ कार्यक्रम येत्या रविवार पासून लाईव्ह

मराठी साहित्य वार्ता ‘काव्यसंवाद’ कार्यक्रम येत्या रविवार पासून लाईव्ह


मुंबई/प्रतिनिधी:- मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टल, युट्युब चॅनल आणि फेसबुक पेज आयाजित ‘‘काव्यसंवाद’’ हा कार्यक्रम येत्या रविवार पासुन (दि. 6 सप्टेंबर 2020 पासून) सायं. 5 ते 6 या वेळेमध्ये मराठी साहित्य वार्ता फेसबुक पेजवर लाईव्ह सुरू होणार आहे. या कार्यक्रमामध्ये जुन्या आणि नव्या पिढीतील कवी/कवयित्रींच्या कवितांवर चर्चा करण्यात येणार आहे. नव्या पिढीचे कवी संकेत अरूण म्हात्रे यांच्या संकल्पनेतुन हा कार्यक्रम साकारला जात असून लाईव्ह साधल्या जाणा-या या संवादामध्ये कवी प्रथमेश पाठक, कवी प्रा. गणेश शिंदे, आदित्य दवणे आदी कवी सहभागी आहेत. हा कार्यक्रम दर रविवारी मराठी साहित्य वार्ता फेसबुक पेजवर सायं. 5 ते 6 या वेळेमध्ये लाईव्ह प्रदर्शित केल्या जाणार असल्याची माहिती मराठी साहित्य वार्ताचे प्रमुख अमरदीप वानखडे यांनी दिली आहे. या लाईव्ह संवादामध्ये साहित्य आणि संस्कृती प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मराठी साहित्य वार्ताच्या व्यवस्थापक वैशाली मोहिते, समन्वयक प्रा. बाळकृष्ण लळीत, राजेंद्र सोमवंशी, तांत्रिक विभाग प्रमुख पवन गवई, प्रा. विजयकुमार गवई, प्रा. दामोदर मोरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या