आंबेडकरी चळवळ अधिक प्रगल्भ करण्यासाठी महिलांनी पुन्हा संघटित होण्याची गरज

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आंबेडकरी चळवळ अधिक प्रगल्भ करण्यासाठी महिलांनी पुन्हा संघटित होण्याची गरज

रमा आंबेडकर : पुण्यात १२ वे रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन

पुणे, ता. २७ : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महिलांनी महाडपासून ते काळाराम मंदिरप्रवेशाच्या प्रत्येक सत्याग्रहात आघाडीवर राहून लढा दिला. हाच संघर्षाचा वारसा अधारित ठेवण्यासाठी महिलांनी पुन्हा संघटित होण्याची गरज आहे,” असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात व सामाजिक कार्यकर्त्या रमा आंबेडकर यांनी केले. कुटुंबाचा कणा असलेल्या स्त्रीने नव्या पिढीला आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची जाणीव करून दिल्यास, आंबेडकरी चळवळ अधिक प्रगल्भ होईल, असेही त्यांनी सांगितले.

रमाई फाऊंडेशन, रमाई मासिक, रमाई प्रकाशन व लोकनेते भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आयोजित महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी, महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी, संत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्णजन्मोत्सव, आचार्य दीनबंधू गुरूजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त १२ वे रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन पुणे येथे दि. २७ मे २०२६ (रमाई स्मृतिदिन) रोजी बालगंधर्व रंग मंदिर, संभाजी पार्क जवळ, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे येथे संपन्न झाले. या साहित्य संमेलनाचेउद्घाटन रमा आंबेडकर-तेलतुंबडे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष व विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, मुख्य संयोजक प्रा. डॉ. रेखा मेश्राम, स्वागताध्यक्ष प्रसन्न गजभिये, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोडे, प्रा. विजयकुमार गवई, अ‍ॅड. के.ई. हरिदास (सत्यशोधक समाज), डॉ. अभिजित वैद्य (पुणे), प्राचार्य म.ना. कांबळे (फुले-आंबेडकर विद्वत सभा), डॉ. बबन जोगदंड (बार्टी, पुणे) डॉ. यशवंत मानखेडकर (पुणे) मा. राजेंद्र शेलार (पुणे),आदी उपस्थित होते. या वेळी दिनकर काकडे लिखित ‘सूर्यपुत्र यशवंत ऊर्फ यशवंतराव बाबासाहेब आंबेडकर’ आणि ‘राष्ट्रमाता रमाई’ या पुस्तकांचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले.

प्रा. परदेशी म्हणाल्या, 'पुरुषसत्ताक, जातिव्यवस्था आणि वर्गव्यवस्था अशी तिहेरी बेडी महिलांना तोडायची आहे. पूर्वी जातीयवाद केला जात होता. आता जातिव्यवस्था झुंडबळीच्या माध्यमातून महिलांचे शोषण करत आहे. त्यामुळे नारीवंदन नको, महिलांना सन्मानाने वागवावे,' अशी अपेक्षा १२व्या रमाई महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी बुधवारी व्यक्त केली. 'मागासवर्गीय, आदिवासी योजनांच्या पैशांवर डल्ला मारून लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिले जात आहेत,' अशी टीका करून 'भाजपसोबत आहेत ते आमचे नाहीत, हे ठामपणे सांगण्याची वेळ आली आहे,' याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सुमारे ३० गुंठे जागेत रमाई आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारले जात आहे. नुकतेच त्याचे भूमिपूजन झाले असून, येत्या दोन वर्षांत हे स्मारक सर्वांसाठी खुले होईल, असे बोडे यांनी सांगितले. कविता मोरवणकर यांनी सूत्रसंचालन केले. दैवशाला गवंदे यांनी आभार मानले.


पहिला परिसंवाद ‘नारी वंदन बील : भ्रम आणि वास्तव’ या विषयावर संपन्न झाला. या परिसंवादाच्या अध्यक्षा डॉ. गीताली वि.म. संपादक ‘मिळून सार्‍या जणी’च्या या होत्या. तर मा. डॉ. नितीश नवसागरे (पुणे), मा. अ‍ॅड. वैशाली डोळस (छ. संभाजीनगर), या परिसंवादातील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. दुसरा परिसंवाद ‘स्त्रीवादी चळवळीचे ५० वर्ष आणि आजचे संदर्भ’ या विषयावर संपन्न झाला. या परिसंवादाच्या अध्यक्ष प्रा. एच.एस. भालेसईनतर वक्ते म्हणून प्रा. माधुरी दीक्षित (अ.नगर), सुषमा पाखरे (वर्धा), डॉ. संजय कांबळे (पुणे) प्रा.प्रवीण कांबळे हे उपस्थित होते. 

तसेच दुपारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांना ‘रमाई गौरव पुरस्कार’ देवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये - मा. सीमा भालेसईन (पुणे) मा. अ‍ॅड. जयश्री भगत (छ. संभाजीनगर) मा. निरंजना आवटे (नांदेड) मा. उज्वला गणवीर (नागपूर) मा. सुरेखा पैठणे (ठाणे) मा. शिल्पा कांबळे (मुंबई) मा. अ‍ॅड. इंदूमती वराळे (छ. संभाजीनगर) मा. वनश्री वनकर (पुणे) मा. आशा डांगे (छ. संभाजीनगर) मा. डॉ. अंजली अभ्यंकर (पुणे) मा. प्रा. रमणी बबिता आकाश (पुणे) मा. प्रांजली वाणी (पुणे) मा. सुरेखा युवराज बर्वे (नाशिक) मा. निशा पंडित (इगतपुरी) मा. सुनिता सोनवणे (सोलापूर) मा. सुजाता ओव्हाळ (पुणे) मा. शीतल साठे (पुणे), मा. चित्रा कुर्‍हे (नाशिक) मा. डॉ. सुनिता बोर्डे (सांगली) मा. अ‍ॅड. गायत्री कांबळे (पुणे) मा. प्रज्ञा बोदडे (पुणे) प्रज्ञा जाधव (मुंबई) मा. कल्पना दिवेकर (घोटी) प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर (पुणे) मा. रूपा धांडे (पुणे) डॉ. यशोधरा सोनवणे (पुणे) मा. मीरा अय्यंगर (पुणे) मा. कमल वानखडे (अकोला) मा. अस्मिता दिघे (कोल्हापूर) मा. करूणा जाधव (छ.संभाजीनगर) डॉ प्रद्ना इंगळे (पुणे) महानंदा डाळिंबे, यांचा समावेश आहे.

‘मी राजगृहातील रमाई बोलते’ हे एकपात्र नाटक प्रा. रमणी बबिता आकाश यांनी सादर केले. तर ‘तरी आम्ही बोलू नये’ हा वैचारिक कवितांचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला.

यावेळी रमाई फाउंडेशन तथा रमाई मासिकाच्या दैवशीला गवंदे, ललिता खडसे, बे, शारदा गजभिये, प्रा. विजया सिरसाट, कल्पना वाहुळे, डॉ. वंदना पाटील, मंगल मून, अनिता डोंगरे, जयश्री सरोदे, सुवर्णा सिरसाट, प्रभा वानखडे, शिला जाधव, अनिता चव्हाण प्रिया भोळे रत्नकला बनसोड यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या