तुझीचं कमाई आहे गं भीमाई, कुणाचेचं काही इथे कष्ट नाही.... बाळापुरात वामनदादा कर्डक डिजिटल जयंती उत्साहात साजरी

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तुझीचं कमाई आहे गं भीमाई, कुणाचेचं काही इथे कष्ट नाही.... बाळापुरात वामनदादा कर्डक डिजिटल जयंती उत्साहात साजरी

महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम



बाळापुर/प्रतिनिधी:- महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्था, बाळापुर जि. अकोलाच्या वतीने बाळापुर शहरात दरवर्षी महाकवी वामनदादा कर्डक जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. परंतु यंदा कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे वामनदादा कर्डक जयंती सोशल डिस्टंसिंग पाळत डिजिटल स्वरूपात साजरी करण्यात आली. हा जयंती महोत्सव मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ता फेसबुक पेजवर लाईव्ह करण्यात आला. या कार्यक्रमाला निर्मिती साहाय्य म्हणून बी. आर. प्रस्तुत म्यूझिकल ग्रुप महाराष्ट्र राज्य, जय हो आॅर्केष्ट्रा अकोला, सम्यक स्वर कला मंच, बुलढाणा आणि स्वरांजली म्यूझिकल ग्रुप बाळापुर आदी संस्थांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारिप बमसंचे नेते बाबाराव तेलगोटे, बुद्ध धम्म सेवा महिला संघाच्या मैनाबाई इंगळे, सुजाता महिला संघाच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई वानखडे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती उत्सव समितीचे प्रमुख अॅड. प्रशांत उमाळे यांनी केले.

यावेळी प्रसिद्ध गायक अरविंद सिरसाट, प्रमोद उमाळे (तबलावादक), जेवरी चावरीया (प्रसिद्ध आॅर्गनवादक), तिलक चावरीया, अनिल गवई, विजय दांडगे (ढोलक वादक), दिनेश गवई, जयदिप वानखडे, सुनील नाईक, राजेश इंगळे गायक, एन. एन. वाकोडे, (गायक), आदींसह अकोला आणि बुलढाणा जिल्हयातील आंबेडकरी कलावंत या महोत्सवात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष अमरदीप वानखडे यांनी केले. तर आभार उत्तमराव दाभाडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या