१३ सप्टेंबर पर्यंत वसतीगृह सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा - प्रा. प्रकाश इंगळे
या संदर्भात कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाने परीक्षेचे गांभीर्य राखले पाहिजे. ऑनलाईन पद्धतीने होणा-या परीक्षेमध्ये पारदर्शकता पाळली जाणार नाही. बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील असून त्यांना नेटवर्क मिळेलच याची शाश्वती नाही. याबरोबरच विद्याथ्र्यांचे शैक्षणिक व अभ्यासाचे साहित्य वसतीगृहामध्ये अडकून आहे. त्यामुळे अभ्यास न करता विद्यार्थी परीक्षेला बसू शकतील का? असा सवाल सम्यकने उपस्थीत केला आहे. या ऑनलाईन परीक्षेमुळे प्रचंड गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा आणि पुढील आठवड्यात होणा-या नेट परीक्षेच्या अभ्यासासाठी विद्यापीठ वसतीगृह तात्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे यांनी दिला आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनावर नारायण खरात, राहुल खंदारे, अमोल घुगे, अनिल दिपके, अक्रम खान, राहुल कांबळे, रोहीत जोगदंड, संकेत कांबळे, पवन साळवे, अमोल शिंदे, उमेश वाघ, सिद्धार्थ कांबळे, रूपाली सावे, वैशाली लहाने, गजानन गवई, अनिल जाधव, शैलेश चाबुकस्वार, विकास गवई आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
0 टिप्पण्या