वंचित बहुजन आघाडीचे अनोखे रक्षाबंधन ; महिला आघाडीने पोलीसांना राखी बांधुन रक्षाबंधन साजरे
तिवसा/सागर भवते (जिल्हा प्रतिनिधी) - सद्यस्थितीत राज्यात महिला व तरुणींबाबत पोलीस प्रशासन न्यायाची भूमिका बजावत नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्टेशन येथे दि. 11 व 12 ऑगस्ट रोजी पोलिसांना राखी बांधून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी केले होते. प्रा. अंजलीताईंच्या आवाहनाला प्रतिसाद देत तिवसा येथे वंचित बहुजन महिला आघाडीचे वतीने पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधण्यात आल्या.
यावेळी महिला आघाडीच्या सदस्यांनी सांगितले की, समाजात काही वेळा रक्षकच भक्षक बनतात असा अनुभव आपल्याला येतो, पुण्यात पोलिसांकडून नागरिकांवर झालेल्या दादागिरीच्या घटनेचा संदर्भ देत महिलांनी पोलिसांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. यावेळी उपस्थित महिलांनी एक पत्र वाचून दाखवले, ज्यात भारतीय संविधानाने स्त्री- पुरुष समानतेचे तत्व अंगिकारले असताना महिलांचा सन्मान आणि समानता समजत नसेल तर किमान रक्षाबंधनाचे महत्व लक्षात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली
यावेळी तिवसा पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार, पीएसआय अमोल मुळे, विजय वानखडे यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांना राखी राखी बांधल्यानंतर पोलिसांनी कायम न्यायाची भूमिका बजावावी हीच खरी ओवाळणी असल्याचे महिला आघाडीचे वतीने सांगण्यात आले. हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर, राज्य उपाध्यक्ष तथा अमरावती जिल्हा निरीक्षक प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या पूजा गोपाळे, माधुरी थोरात, रुपाली मुंद्रे, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते, जिल्हा सदस्य विनोद खाकसे, राहुल मनवर, नितीन थोरात, सागर गोपाळे, प्रवीण निकाळजे, भारतीय बौद्ध महासभाचे भारत दहाट सह पदाधिकारी उपस्थित होते.



.jpeg)
0 टिप्पण्या