भय्यासाहेबांनी देशभरात बौद्ध धम्म पोहचविण्याचे महान कार्य केले - प्रा. प्रकाश जंजाळ

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भय्यासाहेबांनी देशभरात बौद्ध धम्म पोहचविण्याचे महान कार्य केले - प्रा. प्रकाश जंजाळ

बाळापूर (प्रतिनिधी) - बाबासाहेबानी केलेल्या धर्मांतर महासंगरानंतर संपूर्ण देशभरात भय्यासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर सोहळे आयोजित करून बौद्ध धम्माचा प्रचार
 आणि प्रसार केला आहे असे प्रतिपादन आंबेडकरी इतिहासकार प्रा प्रकाश जंजाळ यांनी केले. ते सम्यक विद्यार्थी आंदोलन, बाळापूर तालुका आयोजित भय्यासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यान कार्यक्रमातून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भारिप बमस चे तालुकाध्यक्ष गजाननभाऊ  लांडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ नेते बाबरावजी तेलगोटे, शहराध्यक्ष नितीन उमाळे, माजी
प स  सभापती निरंजन सिरसाट, सम्यक विध्यार्थी आंदोलन तालुका अध्यक्ष विकासभाऊ अवचार उत्तमराव दाभाडे (पत्रकार)  एड प्रशांतभाऊ उमाळे आदी उपस्थित होते.

बाळापूर येथील भव्य बुद्ध विहार येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास अवचार यांनी केले. त्यानंतर बुद्धवंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली.
सूत्रसंचालन अमरदीप वानखडे यानी केले तर आभार प्रदर्शन विकास अवचार यांनी केले
 यावेळी प्रसिध्दी प्रमुख नितेशभाऊ सोनवणे, जितेंद्र भाऊ इंगळे, कमलेशभाऊ तेलगोटे, वैभवभाऊ दांडगे, रवी थेटे, प्रशांत उमाळे, राज अवचार, पराग उमाळे, योगेश वानखडे आदींसह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या