प्रकाश आंबेडकर चुकीचे बोलले नाहीत ; खा. संभाजी राजे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रकाश आंबेडकर चुकीचे बोलले नाहीत ; खा. संभाजी राजे

(सौजन्य-गुगल)

Social24Network

आज वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये त्यांनी एक राजा बिनडोक आहे. आणि दुस-या राजाची मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट नाही अशी घाणाघाती टीका केली होती. या टीकेमुळे संपूर्ण राज्यभरात याचे पडसाद पहायला मिळाले. राज्यभरातुन मराठा समाजाने आंबेडकरांविरूद्ध संतप्त प्रतिक्रिया देत असतांनाच प्रकाश आंबेडकर काहीही चुकीचे बोलले नसल्याची प्रतिक्रिया खा. संभाजी राजे भोसले यांनी दिली आहे. त्यामुळे आज दिवसभरापासून उफाळून आलेला हा वाद आता मिटण्याची शक्यता आहे.  

खा. संभाजी राजेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शाहु महाराज यांचे चांगले संबंध होते. प्रकाश आंबेडकर हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असून ते जे काही माझ्याबद्दल बोलले ते चुकीचे बोलले नाहीत असा खुलासा खा. संभाजी राजे यांनी केला आहे. माझ्याबद्दल ते काहीही उलट सुलट बोलले नसून आमच्या बंधूंवर त्यांनी केलेले वक्तव्य हे अशोभनीय आहे. मला मनापासून ते आवडलेलं नाही. यापूढे त्यांनी असे बोलू नये. शेवटी लोकशाही आहे. सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. असेही ते यावेळी म्हणाले.   

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते वाचा सविस्तर...

एक राजा बिनडोक आहे अशी टिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्यावर केल्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी खा. उदयनराजेंनी ‘‘आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सर्वांचे आरक्षण रद्द करा’’ अशी मागणी केली होती. अशा प्रकारची मागणी करणे हे बिनडोकपणाचेच लक्षण असून ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांना घटना माहिती नाही ते लोक राज्यसभेवर कसे काय निवडल्या जातात अशी घाणाघाती टीका यावेळी अँड. आंबेडकर यांनी केली आहे.

कोणाला आरक्षण द्यावे याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे राज्य सरकार आरक्षण देवू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी होणार नाही याची मराठा नेत्यांनी काळजी घ्यावी. राज्यामध्ये शांतीचे वातावरण बिघडणार नाही यासाठी आपण मराठा समाजाच्या १० आँक्टोंबर रोजी होणा-या बंदला पाठिंबा देत असल्याचे अँड. आंबेडकर यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या