बाळापुर - DREAM2 अभ्यासिका आणि अकॅडमी मध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तसेच पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता परीक्षेवर बोलू काही मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मा.संजय राजेंद्र चिंतलवार हेतसेच प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश कापगते, हेड कॉन्स्टेबल गणेश जाधव शिपाई तसेच भारतीय सैन्य दलातील करण तायडे उपस्थित होते
यावेळी स्पर्धा परीक्षेचा पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना जिद्द, चिकाटी, सातत्य, आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगातून आपण कसे मार्ग काढावे याबद्दल संजय राजेंद्र चिंचलवार यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
एमपीएससी चा अभ्यास करत असताना कोणत्या विषयांना जास्त प्राधान्य दिले पाहिजे अभ्यासाच्या पद्धती अभ्यासाच्या वेळा याविषयी अविनाश कापगते तसेच गणेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. शारीरिक चाचणी, गोळा फेक, रनिंग याविषयी कारण तायडे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या आयुष्यातील संघर्षाची परिस्थिती तसेच अनुभव सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वजीत वानखडे सर यांनी तर आभार उमेश जाधव सर यांनी केले. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या