अकोला (प्रतिनिधी) - देशाची सद्याची स्थिती अत्यंत वाईट होत चालली असून परिवर्तन आवश्यक आहे. आता परिवर्तनाची वेळ आली असून विद्यार्थ्यांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अकोला जिल्हा निरीक्षक स्वाती भारतीय यांनी केले. त्या दोन दिवसीय अकोला जिल्हा दौ-यावर आल्या असता आज (ता. ७) रोजी वणी रंभापुर येथे ग्राम शाखेच्या उदघाटन समारंभाप्रसंगी बोलत होत्या.
अकोला तालुक्यात वणी रंभापुर या गावातील हि पहिली शाखा असून आज त्याचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी सम्यकचे विभागिय अध्यक्ष नितेश किर्तक, जिल्हाध्यक्ष अमोल सिरसाट, जिल्हा महासचिव भाग्यश्री इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष हितेश जामनिक, जिल्हा संघटक राजकुमार दामोदर, जिल्हा कोषाध्यक्ष योगेश किर्तक, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अमरदिप वानखडे, तालुकाध्यक्ष धिरज पांडे, तालुका महासचिव, महानगर महासचिव पवन गवई, प्रसिद्धिप्रामुख रितेश किर्तक, प्रेमकुमार वानखडे यांच्या सह वणी रंभीपुर येथील बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थीनींनी नागरिक उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे १वही-१पेन देवुन स्वागत करुन एक समाजात आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार समाधान वानखडे यांनी केले.









0 टिप्पण्या