औरंगाबाद (प्रतिनिधी) - कला, विज्ञान, वाणिज्य, पदव्युत्तर आणि एमफिलधारक विद्यार्थ्याना स्वाधार शिष्यवृत्ती देण्यात यावी आणि गेल्या दोन वर्षांपासून राहिलेले विद्यावेतनाचे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलन तीव्र आंदोलन उभारणार, असा इशारा सम्यक विदयार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश इंगळे यांनी दिला.
या संदर्भात समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त एस एस शेळके यांना सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वात आज निवेदन देण्यात आले. त्यामध्ये स्वाधार योजना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी शासनाने सुरू केली आहे, परंतु त्याचा जसा उपयोग व्हायचा तसा होत नाही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
या निवेदनावर प्रशांत बोर्डे, जयश्री शिर्के, राहुल खंडारे, अनिल दीपके, अक्रम खान, अमोल घुगे, विशाल वाघ, आदेश आटोटे, अमरदीप वानखडे, अण्णासाहेब सोनोवणे, भीमराव वाघमारे, जयपाल सुकाळे, एन डी बोदडे, रामेश्वर कबाडे-पाटील, नागसेन वानखडे, राहुल कांबळे, मयूर गायकवाड, विश्वद्विप घुगे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

0 टिप्पण्या