वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास सर्वांना केजी टू पीजी शिक्षण मोफत आणि दर्जेदार मिळणारचं - महेश भारतीय

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास सर्वांना केजी टू पीजी शिक्षण मोफत आणि दर्जेदार मिळणारचं - महेश भारतीय


आघाडीच्या निर्णयानंतर देशभरातील विद्यार्थी संघटना व शिक्षणतज्ञ यांनी मानले आभार
मुंबई (प्रतिनिधी)-  सत्तेत आल्यास सर्वाना केजी टू पीजी शिक्षण मोफत आणि दर्जेदार देण्यासाठी १० टक्के जरी खर्च आला तरी तो आम्ही करणारच, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दि. 23 फेब्रुवारी रोजी मुंबई शिवाजी पार्क येथे बोलतांना केली होती. त्या घोषणेला देशभरातील विद्यार्थी संघटनांनी पाठींबा दिला असून शिक्षण तज्यांनी याचे जोरदार स्वागत केले आहे. अशी माहिती सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.

वंचित बहुजन आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आणि एम आय एम पक्षाचे पक्षाचे नेते ओवेसी साहेब यांची जाहीर सभा संपन्न झाली होती. या सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी सत्तेत आल्यास सर्वांना केजी टू पीजी मोफत शिक्षणाचा जो निर्णय घेतला आहे, जो विचार मांडला आहे त्या विचाराचे, त्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून देशाच्या इतिहासातील शिक्षण बजेटवर मोठी घोषणा बाळासाहेब आंबेडकर यांनी केली असल्याचे शिक्षणतज्ज्ञानी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या