‘भारिप’चे 30 सप्टेंबरला कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर ; प्रा. डाॅ. अंजली आंबेडकर करणार मार्गदर्शन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

‘भारिप’चे 30 सप्टेंबरला कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर ; प्रा. डाॅ. अंजली आंबेडकर करणार मार्गदर्शन

 ‘भारिप’चे 30 सप्टेंबरला कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर ; प्रा. डाॅ. अंजली आंबेडकर करणार मार्गदर्शन


पुणे/प्रतिनिधी:- भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिका-यांचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबीराला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. डाॅ. अंजली आंबेडकर मार्गदर्शन करणार असुन कार्यकर्त्यांनी शिबीराला येतांना मास्क घालून येणे बंधनकारक असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे पुणे (पश्चिम) जिल्हाध्यक्ष उत्तमदादा वनशिव यांनी दिली आहे.   

बुधवार, दि. 30 सप्टेंबर, 2020 रोजी हाॅटेल दौलत, नारायण स्वामी मंदिराशेजारी, आंबेगाव खुर्द ता. हवेली जि. पुणे येथे दु. 12 वाजता या शिबीराला सुरूवात होणार असून या शिबीरामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे पुणे पुर्व जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे (पश्चिम) जिल्हाध्यक्ष राम मरगळे, वंचित बहुजन आघाडीचे पुणे (पूर्व) जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, भारिपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सीमा भालेसेन आदींसह पुणे जिल्हा भारिप बमसं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या