बिहार निवडणुकीत आंबेडकर-ओवेसी एकत्र?

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बिहार निवडणुकीत आंबेडकर-ओवेसी एकत्र?

 बिहार निवडणुकीत आंबेडकर-ओवेसी एकत्र?

बिहारमध्ये आंबेडकरांची मुस्लिमांना साद...

टीम सोशल नेटवर्क

बिहार राज्याच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उडी घेतल्याने सत्तेचे समिकरण बदलणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशातच अँड. प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समूहाला आपल्याबरोबर येण्याचे आवाहन केल्याने बिहार निवडणुकीत आंबेडकर-ओवेसी पुन्हा एकदा एकत्र येतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  

महाराष्ट्रात युती का तुटली?

वंचित बहुजन आघाडीने एमआयएमला सोबत घेऊन महारष्ट्रात नव्या पर्वाची मोठ्या धडाक्यात सुरूवात केली होती. त्यामध्ये एमआयएम पक्षाला एका जागेवर विजय मिळवता आला तर वंचित बहुजन आघाडीला यश मिळू शकले नाही. दरम्यान विधानसभेमध्ये ही युती कायम राहीली तर सत्ता परिवर्तन होऊ शकते अशी शक्यता असतांना एमआयएमने विधानसभेच्या १०० जागांची मागणी केल्याने युती होऊ शकली नाही. दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. त्याचा वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या दोन्ही पक्षांना मोठा फटका बसला. असे आंबेडकरांनी यावेळी सांगितले. 

  बिहारमध्ये आंबेडकर-ओवेसी एकत्र?

महाराष्ट्रात झालेली परिस्थिती बिहारमध्ये होऊ नये म्हणून बिहारच्या निवडणूकीच्या निमित्ताने अँड. प्रकाश आंबेडकर यांनी बिहारमधील मुसलमानांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. बिहारमध्ये १६ ते १७ टक्के मुस्लिम समूह आहे. १८ ते १९ टक्के आंबेडकरवादी शेड्युल्ड कास्टचे मतदान आहे. ही दोन्ही समूह एकत्र आल्यास मतांची टक्केवारी ४० टक्क्यांपर्यत जाते. आणि या ४० टक्क्यांच्या भरवशावर कोणत्याही सरकारला पराभूत करता येऊ शकते. एनआरसीचा मुद्या, आरक्षणाचा मुद्या आणि इतर अनेक मुद्ये सरकारला हाताळता आलेले नाहीत ते सरकारचे अपयश आहे. आणि त्यामुळे मुस्लिम धर्मगुरू, मौलाना आणि शिक्षित मुस्लिम बांधवानंी यावर गांभीर्याने विचार करावा. आंबेडकरवादी, आदिवासी, मुस्लिम एकत्र आल्यास एनडीएची सरकार बरखास्त व्हायला बिहारपासून सुरूवात झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास यावेळी आंबेडकर यांनी व्यक्त केला. त्यामुळे पुन्हा एकदा आंबेडकर-ओवेसी एकत्र येतील का? हे येणारा काळचं ठरवणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या