सरकारने व्यावसायिक वृत्तीतुन ऑक्सिजनचे दर वाढविले आहेत. -
रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांचा आरोप
औरंगाबाद/प्रतिनिधी:- कोरोनाच्या महाभयंकर स्थीतीमध्ये नागरीकांना सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी सरकार व्यावसायिक वृत्तीने वागत आहे. कोरोनामुळे जो आर्थिक बोजा सरकारवर पडला आहे तो नागरीकांच्या खिशातुन गोळा करण्याचा घाट सरकारद्वारे घातला जात असून जाणिवपूर्वक ऑक्सिजनचा कृत्रीम तुटवडा निर्माण करून ऑक्सिजनचे दर सरकारद्वारे वाढविण्यात आले असल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांनी केला आहे.
जिल्ह्यात कोरोनाची दिवसेंदिवस रूग्न संख्या वाढत चालली आहे, अशातच ऑक्सिजनच्या प्रचंड तुटवड्याने जवळजवळ 30 टक्के लोक मृत्यूमुखी पडत आहेत. यावर उपाययोजना न करता सरकार ऑक्सिजनचे रेट वाढवून जनतेची लूट करीत असून सरकारने या महाभयंकर परिस्थितीमध्ये अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा करावा जेणेकरून या परिस्थितीवर मात करता येईल.
दरम्यान खासगी दवाखान्यांच्या बीलांचे ऑडिट झाले पाहिजे, ज्या रूग्नालयांनी रूग्नांची नाहक लूट केलेली आहे त्या रूग्नालयांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी सचिन निकम यांनी केली आहे.


0 टिप्पण्या