अमरावती/प्रतिनिधी:- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठा अंतर्गत विविध शाखेतील अभ्यासक्रमात शिक्षण घेत असणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना दिलासादायक बातमी असून कोरोना महामारीच्या आजारामुळे सर्वत्र थैमान घातल्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना परीक्षा आवेदन भरण्यासाठी वेळ मिळाला नाही व त्यामुळे ते विद्यार्थी परीक्षा आवेदन अर्ज भरू शकले नाही त्यासाठी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक हेमंत देशमुख ह्यांना मेल द्वारे 2 जुलै 2020 रोजी पत्र देऊन मागणी केली होती व त्याच मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी 13 ऑगस्ट 2020 रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व परीक्षा नियंत्रक हेमंत देशमुख ह्यांना व्यक्तीशा भेटून अखेर आज मागणी मान्य करून घेऊन सलग चौथ्यांदा परिक्षा आवेदन भरण्यासाठी मुदत वाढ ही प्रथमच देण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी ह्याची नोंद घेऊन परिक्षेपासून वंचित न राहता दिलेल्या मुदतीत त्वरित अर्ज भरावे. दिनांक 7 सप्टेंबर 2020 ते 12 सप्टेंबर 2020 पर्यंत विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा आवेदन अर्ज मुळ शुल्कासह आपल्या संबंधित महाविद्यालयात भरावे असे आवाहन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी केले आहे.


0 टिप्पण्या