सरकारने कलावंतांना शासकीय कार्यक्रम द्यावे - कलावंतांच्या विविध संघटनांचे तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे साकडे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सरकारने कलावंतांना शासकीय कार्यक्रम द्यावे - कलावंतांच्या विविध संघटनांचे तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे साकडे

 सरकारने कलावंतांना शासकीय कार्यक्रम द्यावे - कलावंतांच्या विविध संघटनांचे तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे साकडे


बाळापुर/प्रतिनिधी:- गेल्या सात महिण्यांपासून सुरू असल्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून सरकारने राज्यातील कलावंतांना शासकीय कार्यक्रम द्यावे तसेच कलावंतांना मानधन सुरू करावे आदी विविध मागण्यांचे निवेदन बाळापुर तालुक्यातील कलावंतांच्या विविध संघटनांनी बाळापुर तहसिलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यावेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे प्रकाश अवचार, महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा मराठी साहित्य वार्ताचे संपादक अमरदीप वानखडे, गायक, वादक, साहित्यिक संघटनेचे प्रमोद सिरसाट, प्रज्ञाक्रांती शक्ती अपंग संस्थेच्या संगिता ठोंबरे, परिवर्तन कला मंचाचे विजयानंद सिरसाट, बी आर प्रस्तुत म्यूझिकल ग्रुप महाराष्ट्राचे प्रमोद उमाळे, जय हो आर्केस्ट्राचे अरविंद सिरसाट आदी उपस्थीत होते. 


या आहेत कलावंत संघटनांच्या मागण्या...

१. सर्व प्रकारचे प्रसार प्रचाराचे कामे त्वरील करावे.

२. कलावंतांना पेन्शन योजनेकरीता वयाची अट ४५ वर्षे कारण्यात यावी.

३. कलावंतांच्या पाल्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारे शालेय साहित्य व शाळा विद्यालयाची फी शासनाने भरावी.

४. सामाजिक न्याय विभागाचे सर्व जनहिताचे प्रचार प्रसाराचे कार्यक्रम कलावंतांना देणे सुरू करावे.

५. कोरोना असेपर्यंत लोकलावंतांना अत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा.

६. कलावंत मानधन निवड समिती स्थापन करून शासनकृत प्रतिभावंत अनुभवी कलावंतांची निवड करावी.

७. कलावंतांचे कोरोना लागल्यापासून ते आजर्यंत भरमसाठ आलेले विजबिल माफ करण्यात यावे.

८. अनुदान रक्कम वाढवून ५ हजार रुपये करावी व दरमहिण्याला नियमितपणे देण्यात यावी.

९. गेल्या ६ ते ७ महिण्यापासुन अवळ असलेली जमापुंजी संपल्यामूळे कलावंत कर्जबाजारी झालेले आहेत म्हणुन त्यांना ५० हजाराचे अर्थसहाय्य देण्यात यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या