आंबेडकरी चळवळ संपवू पाहणा-यांपासून सावध राहा - आनंदराज आंबेडकरांचे रामदास आठवलेंवर टीकास्त्र

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आंबेडकरी चळवळ संपवू पाहणा-यांपासून सावध राहा - आनंदराज आंबेडकरांचे रामदास आठवलेंवर टीकास्त्र

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि शैक्षणिक चळवळ संपवू पाहणा-यांपासून समाजाने सावध राहावे असे आंबेडकरी समाजाला आवाहन करीत रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. 

काय म्हणाले आनंदराज आंबेडकर वाचा सविस्तर...

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स ऐज्यूकेशन सोसायटीमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचे मारेकरी घुसवून ही संस्था बरबाद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना खासकरून भाजपाने हाताशी धरून त्यांना मंत्रीपद दिले आहे. त्यांच्या आडून बाबासाहेबांची धार्मिक चळवळ, राजकीय चळवळ आणि शैक्षणिक चळवळ संपविण्याचे षडयंत्र भाजपाने आखले आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेला मी आवाहन करतो की, स्वतः विदुषक बनवून जे लोक आंबेडरी चळवळ संपवू पाहत आहेत त्यांच्यापासून सावधान व्हावे आणि या लोकांना चळवळीतुन भातातील खळ्याप्रमाणे फेकून द्यावे ही वेळ आता आलेली आहे. त्यांना बाजूला करण्यासाठी आंबेडकरी जनतेने तयारीला लागावे असे आवाहन यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Shub म्हणाले…
अगदी बरोबर आहे