काॅंग्रेसच्या औरंगाबाद जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी प्रा. शिलवंत गोपनारायण यांची निवड
औरंगाबाद/प्रतिनिधी:- भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसच्या औरंगाबाद जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी (काॅंग्रेस अनुसूचित जाती विभाग) प्रा. शिलवंत गोपनारायण यांची निवड करण्यात आली आहे. दि. 04 ऑक्टोबर 2020 रोजी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती विभागाची) आढावा बैठक पार पडली. या बैठकीला काॅंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक रमेश साळवे, प्रकाश मगदिया, काॅंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष (काॅंग्रेस अनुसूचित जाती विभाग) डाॅ. अरूण शिरसाट आदी उपस्थीत होते.
प्रा. शिलवंत गोपनारायण सिद्धार्थ महाविद्यालय, औरंगाबाद येथे ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून सद्या कार्यरत असून सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग राहिला आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


0 टिप्पण्या