या कारणामुळे बाळासाहेब उदयनराजेंना ‘‘बिनडोक’’ म्हणाले...

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

या कारणामुळे बाळासाहेब उदयनराजेंना ‘‘बिनडोक’’ म्हणाले...

Social24Network

मराठा आरक्षणाला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने १० आँक्टोंबर रोजी होणा-या बंदला वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. अशी घोषणा त्यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. यासंदर्भात मराठा आरक्षणाचे नेतृत्व दोन राजांनी करण्याच्या संदर्भात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना आंबेडकर म्हणाले की, एक राजा तर बिनडोक आहे. आणि दुस-याला भूमिका असली तरी आरक्षणापेक्षा इतर मुद्यांवर त्यांचा जास्त भर आहे. त्यामुळे आरक्षणासाठी लढा देणा-या संघटनांमध्ये सामजस्य नसल्याची टिका यावेळी आंबेडकर यांनी केली आहे.

एक राजा बिनडोक आहे अशी टिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्यावर केल्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी खा. उदयनराजेंनी ‘‘आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सर्वांचे आरक्षण रद्द करा’’ अशी मागणी केली होती. अशा प्रकारची मागणी करणे हे बिनडोकपणाचेच लक्षण असून ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांना घटना माहिती नाही ते लोक राज्यसभेवर कसे काय निवडल्या जातात अशी घाणाघाती टीका यावेळी अँड. आंबेडकर यांनी केली आहे.

कोणाला आरक्षण द्यावे याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे राज्य सरकार आरक्षण देवू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी होणार नाही याची मराठा नेत्यांनी काळजी घ्यावी. राज्यामध्ये शांतीचे वातावरण बिघडणार नाही यासाठी आपण मराठा समाजाच्या १० आँक्टोंबर रोजी होणा-या बंदला पाठिंबा देत असल्याचे अँड. आंबेडकर यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या