संविधान गुणगौरव परीक्षेत न्यू व्हिजन इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

संविधान गुणगौरव परीक्षेत न्यू व्हिजन इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

बाळापूर/प्रतिनिधी - स्थानिक न्यू व्हिजन इंग्लिश हायस्कूल बाळापूर येथील विद्यार्थ्यांचे सुजाण नागरिक मंच रायगड अंतर्गत स्थापित संविधान गुणगौरव समिती यांच्या विद्यमाने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय संविधान गुणगौरव परीक्षा2025 मध्ये घवघवीत यश या परीक्षेत वर्ग 8 वी चा विद्यार्थी मो. जमालुद्दीन हारिस मो. रिजवान हारीस याने राज्यस्तरावर लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला असून त्याचा भंडारा येथील सामाजिक भवनमध्ये प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

त्याच बरोबर केंद्रस्थरावर मोठ्या गटात कु. प्रज्ञा राहुल तायडे ही प्रथम तर साईराज काळे द्वितीय तसेच कु.लावण्या नरेश लोहकरे हिने तृतीय क्रमांक पटकावला त्याच बरोबर लहान गटात कु. अभिलाषा विजय लोखंडे पहिला, तर कु. अदिती अतुल अवातिरक द्वितीय आणि मो. जमालुद्दीन हारिस तृतीय क्रमांक पटकावला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना बाखडे मॅडम तसेच संविधान गुणगौरव परीक्षेचे समन्वयक प्रा. विश्वजीत वानखडे आणि केंद्रप्रमुख प्रा. उमेश जाधव याबरोबर शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्याचे आई वडील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका, आणि वर्गशिक्षक यांना दिले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या