बाळापूर/प्रतिनिधी - भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या आणि स्त्री मूक्तीच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त स्थानिक ड्रीम स्वेअर अकॅडमीच्या वतिने श्रीराम मंदिर स्थित ड्रीम स्वेअर अभ्यासिकेमध्ये अभिवादन करण्यात आले.
यावेळी कु. विदिशा विश्वजीत वानखडे (इयत्ता 1 ली) हिने सावित्रीमाई फुलेंचा पेहराव परिधान करून उपस्थितांसमोर सावित्रीमाईंचे गीत सादर केले. यावेळी ड्रीम स्वेअर अकॅडमीचे संचालक प्रा. विश्वजीत वानखडे, प्रा. उमेश जाधव, प्रणित वानखडे, विश्वजीत इंगळे, रितेश वाडेकर, गौरव नळकांडे, प्रदीप शिरसाट, रितेश शिरसाठ, प्रेम तायडे, संकेत बोदडे, रोशन दामोदर, राहुल उमाळे, प्रतीक्षा उमाळे, रोशन सुर्वे, आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या