राष्ट्रपती पद म्हणजे रबर स्टॅम्प नव्हे ; मनीषा वाल्मिकी बलात्कार व हत्या प्रकरणावर आनंदराज आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
मुंबई/प्रतिनिधी:- या देशाचे राष्ट्रपती दलित समाजातील आहेत. याचा आम्हाला अभिमान असला तरी राष्ट्रपती पद म्हणजे रबर स्टॅम्प नसून दलित समाजावर अन्याय-अत्याचार होतांना आपल्या अधिराचा वापर त्यांनी करावा टोला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लगावला आहे.
संपुर्ण देशाला हादरविणारी घटना नुकतीच उत्तर प्रदेश मधील हथरस जिल्ह्यात घडली. दलित तरूणीवर बलात्कार करून तीची हत्या करण्यात असुन आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. ही घटना अत्यंत निंदणीय असुन याचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने त्यांनी निषेध नोंदवितांनाच त्यांनी केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही टीका केली आहे. दलित समाजाचे नेते म्हणून घेतात परंतु दलितांवर अन्याय होत असतांना नेते मात्र अभिनेत्रींमध्ये गुरफटत असल्याची टीका त्यांनी यावेळी आहे.
घडलेली घटना अत्यंत निंदनिय असून समाजाने एकत्र होण्याची गरज आहे. समाज एकसंघ राहीला तर कोणाचीही अन्याय करण्याची हिंमत होणार नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे बंड करण्यासाठी उभे राहण्याची आज गरज असल्याचे यावेळी आंबेडकर म्हणाले.


1 टिप्पण्या