ऑनलाईन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना त्रास झाल्यास तीव्र आंदोलन ; विद्यार्थी नेते आकाश हिवराळे यांचा इशारा

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ऑनलाईन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना त्रास झाल्यास तीव्र आंदोलन ; विद्यार्थी नेते आकाश हिवराळे यांचा इशारा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अकार्यक्षम कार्यपद्धतीचा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेकडून जाहीर निषेध


अकोला/प्रतिनिधी :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत होत असणाऱ्या उन्हाळी 2020 च्या परीक्षा ह्या आधी काही कारणास्तव समोर ढकलल्या व त्यानंतर पुन्हा सुनियोजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले व त्या वेळापत्रकानुसार 12 ऑक्टोबर 2020 पासून परीक्षा चालू होणार तोच संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठाच्या अकार्यक्षमतेचे उदाहरण समोर आले आहे.

ते म्हणजे उद्या पेपर तर आज सायंकाळी अचानक वेळापत्रक बदलण्यात येईल व 12 ऑक्टोबर 2020 पासून घेण्यात येणार उन्हाळी 2020ची परीक्षा रद्द करण्यात आली. ह्या सर्व अचानक घेतलेल्या निर्णयाचा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी जाहीर विरोध केला असून  दिलेल्या वेळापत्रक नुसारच परीक्षा घ्याव्या व परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ जबाबदार राहील तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान परिक्षा देताना ऑनलाईन प्रणालीमध्ये अडचणी व त्रास झाल्यास विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे यांनी दिला आहे.

या संदर्भात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे कुलगुरू, परीक्षा नियंत्रक, राज्यपाल महोदय आणि शिक्षण मंत्री महोदय ह्यांना ई मेल द्वारे पत्र पाठविण्यात आले असल्याचे हिवराळे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या