परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्याथ्र्यांना तात्काळ न्याय द्यावा ; प्रा. प्रकाश इंगळे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्याथ्र्यांना तात्काळ न्याय द्यावा ; प्रा. प्रकाश इंगळे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

औरंगाबाद/प्रतिनिधी:- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षेतील गोंधळामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहीले असून त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी विद्यापीठाने तात्काळ त्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे यांनी दिला आहे. 

दरम्यान आज विद्यापीठाच्या कुलगुरूंना सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये म्हटले आहे की, दि. ०९-१०-२०२० व पदव्युत्तरच्या परिक्षा ह्या १४-१०२०२० पासून सुरु झाल्या आहेत. विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये परिक्षा सुरु झाल्या. पण अनेक विद्यार्थी ऑनलाईन व ऑफलाईन परिक्षा पद्धतीमुळे अनेक विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहिले आहेत. म्हणून विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. आपण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपण तात्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलन आंदोलनाचा पवित्रा घेईल, प्रशासनाने नोंद घ्यावी.  

या निवेदनावर संकेत कांबळे, जयश्री शिर्के, सिद्धार्थ कांबळे, रोहित जोगदंड, कपिल वानखेडे, राहुल कांबळे, अनिल दिपके, रामेश्वर कबाडे, राहुल खंदारे, गजानन गवई, भागवत चोपडे, रामेश्वर गोरे, अनिल जाधव, रूपाली सावे, अजय कसबे, प्रदीप राजगुरू, सोनू गायकवाड, अशोक बनकर, शैलेश चाबुकस्वार आदींच्या स्वाक्ष-या आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या