...अन्यथा ७ नोव्हेंबर पासून ‘‘बार्टी’’ कार्यालयासमोर आमोरण उपोषण ; प्रा. प्रकाश इंगळे यांचा इशारा

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

...अन्यथा ७ नोव्हेंबर पासून ‘‘बार्टी’’ कार्यालयासमोर आमोरण उपोषण ; प्रा. प्रकाश इंगळे यांचा इशारा


Otherwise-a-hunger-strike-in-front-of-BARTI's-office-Warnings-of-Prakash-Ingle

Social24Network

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), महात्मा ज्योतीराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आणि छत्रपती शाहु महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानवी विकास संस्था (सारथी) इ. संस्थााद्वारे दिल्या जाणा-या एम.फील. आणि पीएचडीच्या पात्र विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. फेलोशिप धारक विद्यार्थ्यांना बार्टीच्या वतीने संशोधन करण्यासाठी जी फेलोशिप मंजूर झाली आहे त्यामधून अजूनही कोणत्याही प्रकारची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही, अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन कसे करावे? असा संतप्त सवाल सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे यांनी केला आहे.  

Otherwise-a-hunger-strike-in-front-of-BARTI's-office-Warnings-of-Prakash-Ingle

सोशल २४ नेटवर्क या डिजिटल मीडियावर दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रा. प्रकाश इंगळे यांनी राज्यसरकार शिष्यवृत्ती वाटपावरून राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे. फुले-शाहु-आंबेडकरांचे नाव असलेल्या संस्था सरकारद्वारे बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असून यासाठी लवकरच जनआंदोलन उभारणार असल्याची घोषणा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे यांनी यावेळी केली आहे.  

Otherwise-a-hunger-strike-in-front-of-BARTI's-office-Warnings-of-Prakash-Ingle

प्रा. प्रकाश इंगळे म्हणाले की, विद्यार्थ्यांना फेलोशिप ही संशोधन करण्यासाठी दिली जाते. याद्वारे विविध विषयांवर विद्यार्थी संशोधन करून देशाच्या विकासामध्ये आपले योगदान देतात. नव निर्मिती करतात. शासनाकडून आणि महाज्योती, सारथी अथवा बार्टी या संशोधन संस्थांकडून होत असलेली पिळवणूक तात्काळ थांबविण्यात यावी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त १२५ विद्यार्थ्यांना एम.फील. करीता मंजूर करण्यात आलेली फेलोशिप पीएचडी करीता मंजूर करण्यात यावी, ज्याप्रमाणे सारथी या संस्थेने पीडीएफसाठी फेलोशिप सुरू केली आहे त्या धर्तीवर सारथी आणि बार्टी या संस्थांमधूनही ही फेलोशिप देण्यात यावी आदी मागण्यांसाठी येत्या ७ नोव्हेंबर पासून ‘‘बार्टी’’ कार्यालयासमोर आमोरण उपोषण करण्याचा इशारा प्रा. प्रकाश इंगळे यांनी दिला आहे.  

Otherwise-a-hunger-strike-in-front-of-BARTI's-office-Warnings-of-Prakash-Ingle

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या