मुंबई विद्यापीठात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा कच-याच्या ढिगा-यात ; कुलगुरूंनी राजीनामा द्यावा - सचिन बनसोडे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई विद्यापीठात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा कच-याच्या ढिगा-यात ; कुलगुरूंनी राजीनामा द्यावा - सचिन बनसोडे


Social24Network 

मुंबई/प्रतिनिधी:- मुंबई विद्यापीठाच्या गार्डनमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा कच-याच्या ढिगा-यात टाकणारे विद्यापीठ प्रशासन हे आंबेडकर द्वेषी असून याप्रकरणी कुलगुरूंनी कसून चैकशी करावी अन्यथा कुलगुरूंच्या राजीनाम्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी दिला आहे.  

दरम्यान आज मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या दालना समोर कच-याच्या ढिगा-यामध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आढळून आल्या. याप्र्रकरणी संतप्त झालेले रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे आणि अॅड. संदीप केदारे यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याप्रकरणानंतर तात्काळ विद्यापीठ सुरक्षारक्षकांकडून कच-याच्या ढिगा-यामध्ये टाकलेले फोटो हटविण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून राज्यपालांनी आणि शिक्षणमंत्र्यांनी कुलगुरूंना याचा जाब विचारा आणि कुलगुरूंनी तात्काळ या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सचिन बनसोडे यांनी दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या