‘‘समतेच्या महाकाव्या’’तुन मराठी काव्य प्रतिभेतील बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घडते - प्रा. डाॅ. भास्कर पाटील

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

‘‘समतेच्या महाकाव्या’’तुन मराठी काव्य प्रतिभेतील बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घडते - प्रा. डाॅ. भास्कर पाटील


Social24Network

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक कवींनी कविता लिहिल्या आहेत. प्रत्येक कवीची बाबासाहेब मांडण्याची एक वेगळी शैली आहे. या शैलींना एकसंघ करता यावे या भूमिकेतून तयार झालेल्या ‘‘समतेच्या महाकाव्या’’तुन मराठी काव्य प्रतिभेतील बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घडते. असे प्रतिपादन आंबेडकरी अभ्यासक प्रा. डाॅ. भास्कर पाटील यांनी केले आहे. ते ‘‘समतेचे महाकाव्य’’ ग्रंथावर आयोजित परिसंवादामधून बोलत होते.  

समतेचे महाकाव्य हा 1 हजार कवितांचा संग्रह महाग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला असून राज्यभरातील प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते यांच्या सहयोगातुन या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. या ऐतिहासिक ग्रंथावर काल (दि. 14 आँक्टोंबर 2020) रोजी मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र ‘‘मराठी साहित्य वार्ता’’ फेसबुक पेजवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक तथा विचारवंत ज. वी. पवार हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून आंबेडकरी अभ्यासक प्रा. डाॅ. भास्कर पाटील, प्रा. डाॅ. प्रकाश अंधारे हे उपस्थित होते तर या ग्रंथावर भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध कवी तथा साहित्यिक प्रा. नंदु वानखडे यांच्यासह कविता वाचण्यासाठी प्रविण पवार, औरंगाबाद आदी उपस्थित होते.  

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी साहित्य वार्ताचे प्रमुख अमरदीप वानखडे यांनी केले या कार्यक्रमाला 20,000 हुन अधिक लोकांनी उपस्थिती लावली. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या