हाथरस सामुहिक बलात्कार व हत्या प्रकरण: जिल्ह्याधिका-याचा आंबेडकरांवर दबाव ; पुढील न्यायालयीन लढाई आंबेडकर कुटुंबीय लढणार....
Social24Network
हाथरस सामुहिक बलात्कार व हत्या प्रकरणी पोलीसांनी खोटा एफआयआर नोंदविला असून स्थानिक जिल्हाधिकार-यांनी राजरत्न आंबेडकर यांना बलात्कार झाला नसल्याचे जाहिर करा याबाबत दबाव आणला. त्याला झुगारत राजरत्न यांनी पोलीसांची पोलखोल केली आहे. या अत्यंत गंभीर प्रकरणाची एफआयआर चुकीच्या पद्धतीने नोंदविली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदारांवर असा दबाव येवू शकतो तर सामान्य जनतेला ही पोलीस यंत्रणा कोणती वागणुक देत असेल? असा सवाल यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी केला आहे. हे प्रकरण पोलीस आणि सरकारच्या संगनमताने दडपण्याचा प्रयत्न होउ नये म्हणून या प्रकरणाची पुढील न्यायालयीन लढाई आंबेडकर कुटुंब लढणार असल्याचे यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.
दरम्यान उत्तर प्रदेश मधिल हाथरस येथे झालेल्या अत्यंत निंदनिय प्रकाराच्या चैकशीसाठी काल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु राजरत्न आंबेडकर हाथरस येथे भेट दिली होती. पोलीसांनी मात्र त्यांना पिडित तरूणीच्या कुटुंबाला भेटू दिले नाही. त्यानंतर राजरत्न आंबेडकर यांनी स्थानिक जिल्हाधिका-यांची भेट घेतली आणि सदरील प्रकरणाचा आढावा घेतला असता नोदविण्यात आलेला एफआयआर आणि मेडिकल रिपोर्ट अत्यंत चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आली असल्याचे यावेळी राजरत्न आंबेडकर म्हणाले.
सदरील प्रकरणाची पुढील न्यायालयीन लढाई आंबेडकर कुटुंबीय लढणार असून हे प्रकरण उत्तर प्रदेश राज्याच्या बाहेरील न्यायालयात चालविण्यात यावे अशी मागणी यावेळी आंबेडकर यांनी केली आहे. पिडित तरूणीच्या कुटुंबाच्या आम्ही सोबत आहोत. त्यांचा लढा हा आता सामाजिक लढा असून आंबेडकर कुटुंब आपल्या सोबत असल्याचा दिलासा यावेळी आंबेडकर यांनी दिला आहे.


0 टिप्पण्या