मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तात्काळ राजीनामा द्यावा ; सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तात्काळ राजीनामा द्यावा ; सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तात्काळ राजीनामा द्यावा ; सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक 

औरंगाबाद/प्रतिनिधी:- मुंबई विद्यापीठात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा कच-याच्या ढिगा-यात टाकून देणा-या विद्यापीठ प्रशासनाच्या कृत्याने आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत कुलगुरूंनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे यांनी दिला आहे.

याप्रकरणी जाब विचारण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे यांनी फोन द्वारे संपर्क केला असता विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने खुलासा करतांना सांगण्यात आले आहे की, एका कार्यक्रमासाठी काही बोर्ड तयार करण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते बोर्ड इमारतीच्या परिसरात काढून ठेवण्यात आले होते. त्यातील एक बोर्ड हवेद्वारे खाली पडला. ही बाब अनावधानाने झाली असून याप्रकरणी प्रभारी कुलसचिवांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. आणि या प्रकरणाची चैकशी करून योग्य ती कारवाई केल्या जाईल. भविष्यात पुन्हा असे प्रकार घडणार नसल्याची विद्यापीठ प्रशासन दक्षता घेईल असे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  

सदरील प्रकरणाची कसून चैकशी करून योग्य ती कारवाई व्हावी अन्यथा या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत कुलगुरूंनी राजीनामा द्यावा. अशी मागणी यावेळी इंगळे यांनी केली आहे. सद्या देशातील वातावरण प्रचंड ताणलेलं असतांना विद्यापीठाने अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नये असा इशारा यावेळी प्रा. प्रकाश इंगळे यांनी दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या