भारत दुनिया भर में "बलात्कारियों की भूमि" के रूप में जाना जा रहा है ; पैंथर दीपक केदार

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भारत दुनिया भर में "बलात्कारियों की भूमि" के रूप में जाना जा रहा है ; पैंथर दीपक केदार

दलित महिलाओं पर अत्याचार को रोकने के लिए एक स्वतंत्र महिला आयोग का गठन किया जाना चाहिए ; राष्ट्रीय संगोष्ठी का स्वर

Social24Network

जिस देश को भ. बुद्ध की भूमि के रूप में जाना जाता है, वहां के शासकों द्वारा बहुत बुरी स्थिति में है और जातिगत मानसिकता के कारण महिलाओं और दलितों पर अत्याचार किया जा रहा है। मुट्ठी भर लोगों द्वारा देश की छवि को धूमिल किया जा रहा है। भारत में बलात्कार की घटनाओं को विश्व स्तर पर दर्ज किया जा रहा है और भारत विश्व स्तर पर "बलात्कारियों के देश" के रूप में जाना जा रहा है। अखिल भारतीय पैंथर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार ने कहा, यह इस देश का दुर्भाग्य है। वें  सोशल 24 नेटवर्क वेब पोर्टल द्वारा आयोजित "दलित महिलाओं के खिलाफ हिंसा: समस्याएं और समाधान" विषय पर एक राष्ट्रीय संगोष्ठी में बोल रहे थे। इस संगोष्ठी में अतिरिक्त एस.पी. सीमा हिंगोनिया राजस्थान, और सी अलका वर्मा बिहार, पत्रकार अरुण कुमार दिल्ली और अन्य उपस्थित थे।

आगे बोलते हुए, केदार ने कहा कि देश में दलित समुदाय अत्याचारों का सामना कर रहा है। महिलाओं का बलात्कार बढ़ा है। इसलिए, अंतर्राष्ट्रीय स्तर पर, भारत को बलात्कारियों के देश के रूप में जाना जा रहा है। हम इसे रोकने के लिए लोगों का आंदोलन शुरू करने की कोशिश कर रहे हैं। हमें हर बार आंका नहीं जाता। प्रियंका रेड्डी को अलग न्याय दिया जाता है, निर्भया को अलग न्याय दिया जाता है। लेकिन हमारी बहन खैरलांजी, मनीषा वाल्मीकि, पायल तडवी को अभी तक न्याय नहीं मिला है। अखिल भारतीय पैंथर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार ने चेतावनी दी है कि अगर ऐसी न्याय प्रणाली हमारे साथ अन्याय कर रही है, तो हमें पैंथर शैली में आरोपियों को दंडित करने की भूमिका लेने के लिए मजबूर न करें।

अतिरिक्त एस.पी. सीमा हिंगोनिया ने इस अवसर पर कहा कि बलात्कार के मामलों में सामाजिक मानसिकता जिम्मेदार है। जिस तरह महिलाओं / लड़कियों को सलाह दी जाती है कि वे ऐसा करे, ऐसा न करें! पुरुषों को महिलाओं को देखने के तरीके को बदलने की कोशिश करने की जरूरत है। महिलाओं के लिए कानून सख्त हैं। लेकिन उन कानूनों को लागू नहीं किया जाता है। तो इस तरह के अत्याचार हो रहे हैं।

पत्रकार अरुण कुमार ने बोलते हुए कहा कि बलात्कार के मामले में बलात्कार की शिकार महिला को समाज द्वारा दोषी ठहराया जाता है और अपराधी खुले तौर पर समाज में नस्लीय मानसिकता के साथ होता है। अत्याचार की शिकार हुई महिला को निशाना बनाने के लिए सरकार और मीडिया द्वारा किए जा रहे प्रयास लोकतंत्र के लिए घातक हैं। 

तथा इस अवसर पर बोलते हुए, अलका वर्मा ने कहा कि महिलाओं के साथ अन्यायपूर्ण अत्याचारों को रोकने के लिए एक महिला आयोग का गठन किया गया है। यदि महिला आयोग दलित महिलाओं के साथ होने वाले अन्याय पर अंकुश नहीं लगा सकता है, तो दलित समुदाय की महिलाओं के लिए एक स्वतंत्र महिला आयोग का गठन किया जाना चाहिए। उत्पीड़ित समूहों की महिलाएँ इस महिला आयोग की प्रमुख होनी चाहिए ताकि वे अत्याचारों की गंभीरता को समझ सकें वर्तमान महिला आयोग एक राजनीतिक कोटे से बनी टीम है। यह टीम अधिकारियों के साथ काम कर रही है।  

कार्यक्रम का संचालन प्रा। डॉ शिवदत्त ववलकर द्वारा किया गया। इस लाइव सेमिनार में देश भर के 7000 से अधिक लोगों ने भाग लिया।


मराठी बातमी

जगभरात भारताची ओळख ‘‘बलात्कारी लोकांचा देश’’ बनत चालली आहे ; पॅंथर दीपक केदार 

दलित महिलांवर होणा-या अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र महिला आयोगाची स्थापना व्हावी ; राष्ट्रीय परिसंवादातील सूर

Social24Network

भ. बुद्धांचा देश अशी ओळख असलेल्या देशाची अत्यंत वाईट अवस्था राज्यकत्र्यांनी केली असून जातीय मानसिकतेतुन महिलांवर, दलितांवर अत्याचार केले जात आहेत. मुठभर लोकांमुळे देशाची प्रतिमा मलिन होत चालली आहे. भारतामध्ये होणा-या बलात्काराच्या घटनांची जागतीक पातळीवर नोंद घेतल्या जात असून जागतीक पातळीवर भारत देशाची ओळख ‘‘बलात्कारी लोकांचा देश’’ अशी बनत चालली आहे. हे या देशाचे दुर्देव असल्याचे प्रतिपादन आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केले आहे. ते सोशल 24 नेटवर्क वेब पोर्टल आयोजित ‘‘दलित महिलांवरील अत्याचार: समस्या आणि उपाय’’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादातुन बोलत होते. या परिसंवादामध्ये अँडिशनल एस.पी. सीमा हिंगोनिया, जयपूर, राजस्थान, अँड. अलका वर्मा, बिहार, पत्रकार अरूण कुमार दिल्ली आदींचा सहभाग होता.

पुढे बोलतांना केदार म्हणाले की, देशामध्ये दलित समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. महिलांवर बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देशाची ओळख बलात्कारी लोकांचा देश अशी बनत चालली आहे. याला रोखण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला प्रत्येकवेळी न्याय दिल्या जात नाही. प्रियंका रेड्डीला वेगळा न्याय दिला जातो, निर्भयाला वेगळा न्याय दिल्या जातो. मात्र आमच्या खैरलांजी येथील भगिनीला, मनीषा वाल्मिकीला, पायल तडवीला अजून न्याय दिल्या जात नाही. अशा प्रकारची न्याय व्यवस्था आमच्यावर अन्याय करीत असेल तर पॅंथर स्टाईलने आरोपींना शिक्षा देण्याची भूमिका आम्हाला घ्यायला भाग पाडू नका असा इशारा आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे. 

अँडिशनल एस.पी. सीमा हिंगोनिया बोलतांना म्हणाल्या की, बलात्काराच्या घटनांमध्ये सामाजिक मानसिकता जबाबदार आहे. ज्याप्रमाणे महिलांना/मुलींना हे करा ते करू नका असे सल्ले दिले जातात त्या प्रमाणे पुरूषांना महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महिलांसाठी कायदे कडक आहेत. परंतु त्या कायद्यांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे अत्याचार घडत आहेत.  

पत्रकार अरूण कुमार, बोलतांना म्हणाले की, बलात्काराच्या प्रकरणामध्ये ज्या महिलेवर बलात्कार झाला त्या महिलेला समाज दोषी ठरवतो आणि अत्याचारी हा जातीय मानसिकतेतुन खुलेआम समाजात वावरतो. अत्याचारीत घटनांमध्ये ज्या महिलेवर अत्याचार झाला तीलाच टार्गेट करण्याचा सरकार आणि मीडियाचा प्रयत्न लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे समाज अत्याचारीत महिलांकडे चूकीच्या नजरेने पाहतो. मुळात जेव्हा सरकार आणि मीडिया ज्यांनी आरोप केला आहे, ज्यांनी अत्याचार केला आहे. त्यांना फोकस करेल तेव्हा त्यांची समाजात पत राहणार नाही. आणि अशा प्रकारचे कृत्ये करणा-या विचारसरणीला आळा बसायला मदत होईल. 

अँड. अलका वर्मा बोलतांना म्हणाल्या की, महिलांवर होणा-या अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी महिला आयोगाची स्थापन करण्यात आली आहे. महिला आयोग जर दलित महिलांवर होणा-याला अन्याय-अत्याचाराला आळा घालू शकत नसेल तर दलित समाजाच्या महिलांसाठी स्वतंत्र महिला आयोग स्थापन करण्यात यावा. अत्याचारीत समुहातील महिला या महिला आयोगाची प्रमुख असावी जेणे करून त्यांना त्या अत्याचाराचे गांभीर्य असेल. सद्याचे महिला आयोग ही राजकीय कोट्यातुन निर्माण केलेली टीम आहे. सत्तेच्या बरोबर ही टीम काम करीत आहे. असा आरोप यावेळी अँड. वर्मा यांनी केला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डाॅ. शिवदत्त वावलकर यांनी केले. या लाईव्ह परिसंवादामध्ये देशभरातुन 7000 च्या वर लोकांनी सहभाग घेतला.

                                      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या