हाथरस प्रकरण: शारिरीक बलात्कारापेक्षा यंत्रनेने केलेला बलात्कार महाभयंकर ; पॅंन्थर नेते दीपक केदार

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हाथरस प्रकरण: शारिरीक बलात्कारापेक्षा यंत्रनेने केलेला बलात्कार महाभयंकर ; पॅंन्थर नेते दीपक केदार

 हाथरस प्रकरण: शारिरीक बलात्कारापेक्षा यंत्रनेने केलेला बलात्कार महाभयंकर ; पॅंन्थर नेते दीपक केदार



उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून घटनेमध्ये पिडित तरूणीवर झालेल्या शारिरीक बलात्कारापेक्षा राज्यसरकार, पोलीस आणि डाॅक्टर यांच्या संगनमताने झालेला यंत्रनेचा सामुहिक बलात्कार महाभयंकर असल्याचा आरोप ऑल इंडिया पॅंन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केला आहे.  

दरम्यान या प्रकरणामध्ये गॅंग रेप झाला नसल्याची माहिती स्थानिक एसपींनी पत्रकार परिषदेमध्ये दिली होती. त्यावर प्रतिक्रिया देतांना केदार म्हणाले की, पोस्टमार्टम रिपोर्ट चुकीचा बनविण्यात आला आहे. पिडित तरूणीच्या कुटुंबाला विश्वासात न घेता तीच्यावर अंत्यसंस्कार केला आहे. ही अत्यंत घृणास्पद बाब असून पुरावे नष्ट करण्याचा हा डाव आहे. मनीषा वाल्मिकी या भगिनीवर दोनवेळा सामुहिक बलात्कार झाला आहे. तीच्या न्यायाचा, हक्काचा, अधिकाराचा गॅग रेप या व्यवस्थेने केला आहे. या गॅग रेपमध्ये पोलीस, दवाखान्यातील डाॅक्टर, आणि राज्यसरकार सहभागी आहेत असा आरोप यावेळी केदार यांनी केला आहे.  

जनआंदोलनासाठी सज्ज होण्याचे आवाहन

या देशामध्ये संविधानवादी विरूद्ध मनुवादी हा संघर्ष सुरू झाला आहे, मानवतावादी विरूद्ध मनुस्मृती असा संघर्ष सुरू झाला आहे. हा संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही. योगी आदीत्यनाथ हे आधुनिक मनु असून त्यांना गाय वाचवायची आहे मात्र माय वाचवायची नाही. गाय वाचविणारी सत्ता महिला वाचवू शकत नसेल तर उलथुन टाकली पाहिजे. सामाजिक आंदोलनाचा वणवा पेटवावा लागेल. फुले-शाहु-आंबेडकरांच्या देशभरातील पुरोगामी विचारांच्या वारसदारांना या जनआंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन ऑल इंडिया पॅंन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या