प्रा. अविनाश डोळस स्मृति वेबिनार || फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता निरंतर विचारवंत असावा. - डाॅ. ऊमेश बगाडे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. अविनाश डोळस स्मृति वेबिनार || फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता निरंतर विचारवंत असावा. - डाॅ. ऊमेश बगाडे

The activist in the Phule-Ambedkar movement should be a constant thinker. - Dr. Umesh Bagade


Social24Network

फुले-आंबेडकरी चळवळीत दिवसेंदिवस आत्यंतिक व्यक्तिवाद बोकाळत चालला आहे. हे चळवळीसाठी घातक आहे. फुले-आंबेडकरी चळवळीत कायम संवाद चालला पाहिजे. केवळ आपसातच नाही तर समविचारी आणि अगदी विरोधी विचार प्रवाहाशीही कायम संवाद साधला जाणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाग प्रमुख डाॅ. ऊमेश बगाडे यांनी व्यक्त केले. ते प्रा अविनाश डोळस प्रतिष्ठानने प्रा. अविनाश डोळस सरांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष वेबिनार मधील व्याख्यानात बोलत होते.  

या प्रसंगी त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरासोबत असणा-या कार्यकर्त्यांच्या चळवळीतील सहभागावर विषेश प्रकाश टाकून चळवळीतील कार्यकर्ता कसा असावा याबद्दल सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमाची अध्यक्षीय सांगता डाॅ. प्रकाश सिरसाठ यांनी केली. डाॅ. संजय मून यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भुमिका सांगितली, डाॅ. क्षमा खोब्रागडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन केले तर डाॅ. प्रज्ञा साळवे यांनी उपस्थितांचे  आभार मानले. या प्रसंगी वेबणारला आयु.सिद्धार्थ आल्टे, आयु जॅकलिन डोळस, डाॅ. मधुकर खंदारे, डाॅ. वाल्मिक सरवदे, डाॅ. ऊत्तम अंभोरे, आयु.अनिल खरतडे, प्रा. भारत शिरसाठ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या