पदवीधरांनो... भजे तळून विका म्हणणा-यांना त्यांची जागा दाखवून द्या ; पॅंथर दीपक केदार यांचे आवाहन...

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पदवीधरांनो... भजे तळून विका म्हणणा-यांना त्यांची जागा दाखवून द्या ; पॅंथर दीपक केदार यांचे आवाहन...

Graduate voting team election; All India Panther Sena's public support for the Vanchit Bahujan Aaghadi

Graduate voting team election; All India Panther Sena's public support for the Vanchit Bahujan Aaghadi


Social24Network

केंद्रातील भाजपा सरकार पदवीधरांना भजे तळून विकण्याचा सल्ला देत आहे तर राज्य सरकार एका जातीपुरतं मर्यादित काम करीत आहे. सत्ताधा-यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी वंचित बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणा-या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केले आहे. याबरोबरच या निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना  त्यांनी ऑल इंडिया पँथर सेनेचा पाठिंबा जाहिर केला आहे. 

सोशल 24 नेटवर्कशी बोलतांना केदार म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच या वंचित घटकांना न्याय देऊ शकते आणि म्हणून ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने वंचितांच्या न्याय हक्कांसाठी, सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती बदलवण्यासाठी, पदवीधर वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागाचे उमेदवार प्रा. नागोराव पांचाळ, नागपूर विभागाचे उमेदवार इंजि. राहुल वानखेडे, पुणे  विभागाचे उमेदवार प्रा. सोमनाथ साळुंखे यांना ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने आम्ही जाहिर पाठिंबा देत आहोत.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील पदवीधर त्याच्या सर्वांगीण विकासापासुन वंचित आहे. पदवीधर हा अफाट बेरोजगार झालेला आहे, त्याला नोकरी नाही, हाताला काम नाही. महाराष्ट्रात पदवीधरांच्या वाढत चालेल्या आत्महत्या चिंतेचा विषय झालेला आहे. घराणेशाहीने केवळ सत्ता भोगली त्यांनी केवळ पदवीधरांचा वापर आमदारकी मिळवण्यासाठी केला. पदवीधर मात्र न्याय हक्कांपासुन वंचित राहीला. केंद्रातल्या सरकारने भजे तळुन विकण्याचा सल्ला दिला तर राज्यातील सरकारने पदवीधर भिकाला लावला. प्रस्थापित पदवीधर आमदाराने कधीही पदवीधरांच्या प्रश्नांवर आवाज उठवलेला नाही. पदवीधरांच्या हाताला काम नाही, पदवी हातात पण नोकरी नाही, पदवीधर आज आत्महत्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे समग्र महाराष्ट्रात या व्यवस्थेविरोधात वंचित पदवीधरांमध्ये प्रचंड आक्रोश आहे.  

वंचित पदवीधर घटकांचा आवाज म्हणुन वंचित बहुजन आघाडीच एकमेव पर्याय आहे. प्रस्थापित घराणेशाहीची ही व्यवस्था पदवीधर-गोरगरीबांच्या मुळावर उठलेली आहे. पदवीधर मतदारसंघाची ही निवडणुक पदवीधरांच्या अस्तित्वाची निवडणुक आहे. ही निवडणुक म्हणजे पदवीधर बचाव आंदोलन आहे. पदवीधरांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी, न्याय हक्कांसाठी, सर्वांगीण विकासासाठी, त्याच्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्रा. नागोराव काशिनाथ पांचाळ यांना ऑल इंडिया पँथर सेना जाहिर पाठिंबा देत आहे. त्यांना विजयी करुन पदवीधरांचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या