Amravati Teachers Constituency Election 2020; Support for the Vanchit Bahujan Aaghadi's Mahesh Davre
Social24Network
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ 2020 निवडणुकीत महेश विष्णुपंत डवरे यांना वंचित बहुजन आघाडीने आज जाहिर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील घोषणा आज वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंट्री बोर्ड सदस्य अशोक सोनोने यांनी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता प्रा. डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जि. प. अकोलाच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरूंधती सिरसाट, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रभाताई सिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजाभाउ भोजने, अमरावती जिल्हाध्यक्ष शैलेश गवई, अमरावती जिल्हाध्यक्ष अमिन पटेल, वाशिम जिल्हाध्यक्ष रविंद्र देशमुख, फुले-आंबेडकर सभेचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रा. विजय आठवले, बालमुकुंद भिरड, अँड. संतोष राहाटे आदी उपस्थित होते.
शिक्षक मतदार संघाच्या या निवडणुकीमध्ये एकुण 34690 मतदार अमरावती विभागात असून वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, युवक आघाडी, महिला आघाडी, फुले-आंबेडकर विद्वत सभा आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकत्र्यांनी तन मन धनाने महेश डवरे यांच्या विजयासाठी प्रचार करावा आणि आपल्या उमेदवाराला निवडुन आणावे असे आवाहन सोनोने यांनी केले आहे.


0 टिप्पण्या