Social24Network
चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा हे अभयारण्य असून जगप्रसिद्ध आहे जंगलात मध्ये दोन भाग आहेत एकाला कोर, व दुसऱ्याला बफर म्हणतात. ताडोबा अभयारण्य बघण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येतात, जंगलाच्या देखरेखीसाठी सरकारी अधिकारी व कर्मचारी आहेचं, परंतु पर्यटकांना आपला जीव धोक्यात टाकून जंगलामध्ये फिरवणे हे एक महत्त्वाची कामगिरी रोजंदारी कामगार करतात. या रोजंदारी कामगारची संख्या जवळपास 160 आहे. हे रोजंदारी कामगार जवळपास वीस वर्षापासून कार्यरत आहे, ताडोबा अभयारण्य बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकाच्या सफारीवर यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हे रोजंदारी कामगार ताडोबा अभयारण्य च्या जवळपास असलेल्या गावातील आहेत. कोरोना महामारी लॉकडाऊन च्या काळात अभयारण्य बंद होते त्यामुळे या असंघटित रोजंदारी कामगारांना कुटुंबासह अक्षरशा उपाशी राहावे लागले आहे. यांची दखल प्रथम ताडोबा अभयारण्य प्रशासनाने घेऊन राज्य सरकारला कळविले पाहिजे होते.ते त्यांची नैतिक जबाबदारी होती. संघटीत कामगारांची दखल सर्वच घेतात परंतु असंघटित कामगारांची दखल कोणीच घेत नसते हे कामगारांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी कामगारांनी पुढाकार घेतला पाहिजे. सत्यशोधक कामगार संघटना त्यांच्या सोबत उभी राहते ही १८९० पासूनची परंपरा आज ही कायमस्वरूपी किर्याशील कार्यकर्ते पळत आहेत.
असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सत्यशोधक कामगार संघटनेचे राज्य महासचिव किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांना ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या परिवारासह ताडोबा अभयारण्य रोजंदारी कामगाराची भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि सनदशीर मार्गाने सर्वपरीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
राज्य सरकार व केंद्र सरकारला देशातील अभयारण्य पर्यटकांच्या माध्यमातून रोजंदारी कामगार करोडो रुपये कमावून उत्पन्न करून देतात. त्याचं असंघटित रोजंदारी कामगारांची कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळेच अभयारण्यातील रोजंदारी कामगारांना उपासमारीचे दिवस काढावे लागतात. अश्या कामगारांना राज्य सरकारने त्वरित शासकीय सेवेत सामावून घ्यावे आणि त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब हे राज्य सरकारला करणार आहेत. त्यासाठी वेळ पडल्यास जन आंदोलन करण्याची तयारी रोजंदारी कामगारांनी ठेवावी. त्यात राज्यातील सर्व असंघटित कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या शिवाय राहणार नाहीत. असे आश्वासन कामगारांना यावेळी किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी दिले.
0 टिप्पण्या