वंचित बहुजन आघाडीचा पुण्यात काकड आरती उत्सव

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीचा पुण्यात काकड आरती उत्सव


Social24Network

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व धार्मिक स्थळे खुली करण्यात यावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले. वंचित बहुजन आघाडी च्या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी पाडव्या पासून महाराष्ट्रातील सर्व मंदिर मजिद देवालय सर्व धार्मिक स्थळे सुरू केली यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने अप्पर सुपर येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरा जवळ आज (दि. १९ नोव्हेंबर) रोजी पहाटे पाच वाजता काकड आरती उत्सव साजरा करण्यात आला.



याप्रसंगी ह. भ. प. प्रकाश राजापूरे, गौरी कदम, महादेव हनमघर, वसंतराव दोडके, शिवाजी वाघमारे भजनी मंडळ व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश सदस्य ऋषीकेश नांगरेपाटील, नवनीत अहिरे, संदीप चौधरी, रावसाहेब साबळे, प्रशांजित बानेस्वर, मंगेश गायकवाड, अप्पा नक्तीलक कार्यकर्ते आदी कार्यकर्ते उपस्थित होते. विभागातील युवा कार्यकर्ते सागर भालेराव व आनंद सरवदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या