दामोदर मोरे की कविताओं मे आंबेडकरवादी दृष्टि ; ग्रंथाचे उद्या प्रकाशन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दामोदर मोरे की कविताओं मे आंबेडकरवादी दृष्टि ; ग्रंथाचे उद्या प्रकाशन

Ambedkarite vision in Damodar More's poems; Tomorrow's publication of the book

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार प्रकाशन सोहळा

Marathi Sahitya Warta

मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टल, फेसबुक पेज आणि युट्युब चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘दामोदर मोरे की कविताओं में आंबेडकरवादी दृष्टि’’ या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा उद्या (दि. 8 नोव्हेंबर 2020 रोजी) सकाळी 11 वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम मराठी साहित्य वार्ता फेसबुक पेजवर लाईव्ह करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे हिंदी विभाग प्रमुख प्रो. डाॅ. अर्जुन चव्हाण हे असणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून, ग्रंथावर भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध समीक्षक प्रा. डाॅ. प्रकाश राठोड उपस्थीत राहणार आहेत. याबरोबरच मनोगत व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दामोदर मोरे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ख्यातनाम कवयित्री कविता मोरवणकर या करणार असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.  

प्रा. दामोदर मोरे यांची मराठी भाषेत बारा तर हिंदी भाषेत सहा पुस्तके प्रकाशित आहेत. विविध विद्यापीठाच्या अभ्याक्रमातही त्यांच्या कवितांचा समावेश केला गेला असून त्यांच्या हिंदी कवितेवर एम. फिल. पीएच.डी.चा अभ्यासही सुरु आहे. त्यांच्या पाच हिंदी कविता संग्रहावर लखनऊ विद्यापीठाचे प्रोफेसर डाॅ. कालीचरण स्नेही यांनी 'दामोदर मोरे की कविता में आंबेडकरवादी दृष्टि' हे पुस्तक संपादित केले असून विविध राज्यातल्या समीक्षकांचे तेहतीस अभ्यासपूर्ण लेख या ग्रंथात आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या