...अन्यथा मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवरील सुरक्षा वाढवायला सुरवात करावी ; पॅंथर दीपक केदार यांचा आक्रमक इशारा

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

...अन्यथा मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवरील सुरक्षा वाढवायला सुरवात करावी ; पॅंथर दीपक केदार यांचा आक्रमक इशारा

...otherwise the Chief Minister should start increasing security on Matoshri; Panther Deepak Kedar's aggressive warning

(फोटो सौजन्य गुगल)
Social24Network

फुले शाहु आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दलित तरूणांच्या/बौद्ध तरूणांच्या एकापाठोपाठ एक हत्या सत्र सुरू आहे. आमच्या आया बहिनीवर अत्याचार सुरू आहेत. या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. सुनियोजितपणे प्रत्येक प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करीत आहे. आरोपींना पाहुण्यासारखी वागणूक दिल्या जात आहे कारण ज्याच्यावर अन्याय/अत्याचार झाला तो दलित आहे, बौद्ध आहे, गरीब आहेत. गरीबांचे हत्याकांड करायचे आणि श्रीमंतांच्या पाठिशी उभे राहायचे हे धोरण सरकारने अवलंबिले आहे. आम्ही महाराष्ट्रातील मनुवादी आणि जातीयवाद्यांबरोबरच इथल्या यंत्रणेला इशारा देतो की, दलित अन्याय/अत्याचाराची प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम वाईट होतील. महाराष्ट्रात शांतता राखायची असेल कायदा व सुव्यवस्था राखायचा असेल तर सुधीर कांबळे, भीमराज गायकवाड, अरविंद बनसोड, विराज जगताप यांना तात्काळ न्याय द्या अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनील देशमुख यांनी मातोश्रीवर आणि मंत्रालयावरील सुरक्षा वाढवायला सुरूवात करावी, असा आक्रमक इशारा आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे.  

दरम्यान लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात कार्ला या गावातील बौद्ध तरूण सुधीर कांबळे हत्येप्रकरणी आज आॅल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी पिडित कुटुंबाची भेट घेतली. सुधीर कांबळे या बौद्ध तरूणाने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला असून पोलीस यंत्रणा पिडित कुटुंबाचे सात्वन करायचे सोडून, त्यांना न्याय मिळवून द्यायचे सोडून गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा प्रकार केदार यांनी उघडकीस आणला आहे. पिडित कुटुंबाला धीर देण्याएवजी त्यांना पुरावा मागीतला जात आहे. पुरावा हा पिडित कुटुंबाने द्यायचा तर पोलीसांनी काय करायचं? असा संतप्त सवाल आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय दीपक केदार यांनी केला आहे.   

सुधीर कांबळे हत्या प्रकरणी दीपक केदार म्हणाले की, आम्ही पुरावा देतोय, प्रेमपत्रे दाखवतोय, मुलाला मारून लटकविल्याचे सांगतोय, आरोपीची नावे सांगतोय, तक्रार देतोय परंतु तरी सुद्धा पोलीस यंत्रणा आरोपीला अटक करायला तयार नाही. आजपर्यंत पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही. रिपोर्ट देणारे डाॅक्टर अचानक गायब झाले आहेत.हाथरसच्या धर्तीवर हे प्रकरण दाबले जात असून या प्रकारामुळे आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलीस पाटील ते गृहमंत्री या प्रकरणात आरोपी आहेत. आम्ही सुधीरला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यासाठी व्यापक लढा उभारण्याचा इशारा दीपक केदार यांनी दिला आहे.  

आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी या प्रकरणी डीवायएसपी नवले यांना निलंबीत करण्याची मागणी केली असून पोस्टमार्टम करणा-या डाॅक्टरचे निलंबन झाले पाहिजे, अरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी इत्यादी मागण्या केल्या आहेत. दीपक केदार म्हणाले आहेत की, लवकरच राज्यात दलित/बौद्ध बचाव अभियानाला सुरूवात करणार असून सरकारने आमचा अंत पाहु नये आमचा उद्रेक केव्हाही बाहेर निघेल. तो तुम्ही पेलू शकणार नाही. 

...otherwise the Chief Minister should start increasing security on Matoshri; Panther Deepak Kedar's aggressive warning


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या