मराठी साहित्य वार्ता आयोजित महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार - 2020 ; नावनोंदणी व साहित्य पाठविण्याची मुदत 10 नोव्हेंबर पर्यंत

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी साहित्य वार्ता आयोजित महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार - 2020 ; नावनोंदणी व साहित्य पाठविण्याची मुदत 10 नोव्हेंबर पर्यंत

Social24Network 

मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टल, युट्युब चॅनल आणि फेसबुक पेज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2020 द्वारा आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी नावनोंदणी करण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली असून स्पर्धकांनी 10 नोव्हेंबर नावनोंदणी करून साहित्य पाठवावे असे पर्यंत साहित्य पाठवावे असे आवाहन मराठी साहित्य वार्ताचे प्रमुख अमरदीप वानखडे यांनी केले आहे. 

नावनोंदणी करण्यासाठी 9595892542 या गुगल पे/फोन पे नंबर नोंदणी शुल्क भरून करावी. त्यानंतर फी भरल्याचा स्क्रिनशाॅट 9595892542 या नंबरवर पाठवावा. विविध स्पर्धांची नियमावली पुढीप्रमाणे...

काव्य लेखन स्पर्धा नियमावली

1. कवितेला विषयाचे बंधन नाही. स्पर्धकांनी 16 ते 20 ओळींची फक्त एकच कविता पाठवावी. 

2. स्पर्धकांनी आपली कविता दि. 1 नोव्हेंबर 2020 ते 10 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पाठवावी. त्यानंतर पाठविण्यात आलेल्या कविता स्वीकारल्या जाणार नाहीत.  

3. स्पर्धकांनी आपली कविता व्हाट्सएप ग्रुपवर पाठवाव्यात इतरत्र कुठेही पाठवू नये. इतरत्र पाठविलेल्या कविता स्वीकारल्या जाणार नाहीत. व्हाट्सएप ग्रुपची लिंक नाव नोंदणी केल्यानंतर देण्यात येईल.

4. स्पर्धकांनी आपली कविता टंकलिखित (टेक्ट स्वरूपात) करूनच पाठवावी. पीडीएफ अथवा वर्ड फाईल स्वीकारल्या जाणार नाही. 

5. कवितेचा आशय राष्ट्रीय एकात्मतेला बाधक ठरणारा नासावा. कुणाच्याही सामाजिक, धार्मिक भावना दुखावणारा नसावा. 

6. कविता ही मराठी प्रमाण भाषेतील असावी.

7. जातीय भावना वाढीस लागतील, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचेल असे कुठलेही संकेत कवितेत नसावे. 

8. कविता पाठवितांना सर्वात वर ‘‘मराठी साहित्य वार्ता’’ आयोजित ‘‘महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार - 2020’’ काव्य स्पर्धा असा उल्लेख असावा. 

9. आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि ईमेल आयडी कवितेच्या खाली द्यावा. 

10. कविता पाठवितांना ती स्वलिखित असल्याची नोंद सर्वांत शेवटी करणे बंधनकारक राहील.

लघु कथा लेखन स्पर्धा नियमावली स्पर्धा 

1. लघु कथा स्पर्धेला विषयाचे बंधन नाही. 

2. स्पर्धकांनी आपली लघु कथा दि. 1 नोव्हेंबर 2020 ते 10 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पाठवाव्यात. त्यानंतर पाठविण्यात आलेले साहित्य स्वीकारल्या जाणार नाहीत. 

3. स्पर्धकांनी आपली लघु कथा फक्त व्हाट्सएप ग्रुपवर पाठवी इतरत्र कुठेही पाठवू नये. इतरत्र पाठविलेले साहित्य स्वीकारल्या जाणार नाहीत. व्हाट्सएप ग्रुपची लिंक नाव नोंदणी केल्यानंतर देण्यात येईल.

4. स्पर्धकांनी आपली लघु कथा टंकलिखित (टेक्ट स्वरूपात) करूनच पाठवावी. पीडीएफ अथवा वर्ड फाईल स्वीकारल्या जाणार नाही. 

5. लघु कथेसाठी शब्द मर्यादा 100 ते 600 शब्द एवढी ठरविण्यात आली आहे. 600 शब्दांच्यावर पाठविण्यात येणारी कथा स्पर्धेतुन बाद ठरविण्यात येईल. 

6. अलक म्हणजेच अति लघु कथा स्वीकारल्या जाणार नाही. 

7. लघु कथा ही मराठी प्रमाण भाषेतील असावी.

8. जातीय भावना वाढीस लागतील, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचेल असे कुठलेही संकेत लघु कथेत नसावे. 

9. लघु कथा पाठवितांना सर्वात वर ‘‘मराठी साहित्य वार्ता’’ आयोजित ‘‘महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार - 2020’’ लघु कथा स्पर्धा असा उल्लेख असावा. 

10. आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि ईमेल आयडी लघु कथेच्या खाली द्यावा. 

11. लघु कथा पाठवितांना ती स्वलिखित असल्याची नोंद सर्वांत शेवटी करणे बंधनकारक राहील. 

ललित लेखन स्पर्धा नियमावली 

1. ललित लेखन स्पर्धेचा विषय ‘‘बाग मनाची फुलवू सकारात्मकतेने’’ हा असणार आहे.  

2. स्पर्धकांनी आपले साहित्य दि. 1 नोव्हेंबर 2020 ते 10 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पाठवावी. त्यानंतर पाठविण्यात आलेले साहित्य स्वीकारल्या जाणार नाहीत. (शब्द मर्यादा 600)

3. स्पर्धकांनी आपली लेख फक्त व्हाट्सएप ग्रुपवर पाठवावे इतरत्र कुठेही पाठवू नये. इतरत्र पाठविलेले साहित्य स्वीकारल्या जाणार नाहीत. व्हाट्सएप ग्रुपची लिंक नाव नोंदणी केल्यानंतर देण्यात येईल.

4. स्पर्धकांनी आपली लेख टंकलिखित (टेक्ट स्वरूपात) करूनच पाठवावी. पीडीएफ अथवा वर्ड फाईल स्वीकारल्या जाणार नाही. 

5. जातीय भावना वाढीस लागतील, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचेल असे कुठलेही संकेत लेखनात नसावे. 

6. लेख पाठवितांना सर्वात वर ‘‘मराठी साहित्य वार्ता’’ आयोजित ‘‘महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार - 2020’’ ललित लेखन स्पर्धा असा उल्लेख असावा. 

7. आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लेखाच्या खाली द्यावा. 

8. लेख पाठवितांना स्वलिखित असल्याची नोंद सर्वांत शेवटी करणे बंधनकारक राहील. 

चारोळी लेखन स्पर्धा नियमावली 

1. सदरील चित्र हे चारोळी स्पर्धेचा विषय राहील. 

2. स्पर्धकांनी आपली चारोळी दि. 1 नोव्हेंबर 2020 ते 10 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पाठवावी. त्यानंतर पाठविण्यात आलेले साहित्य स्वीकारल्या जाणार नाहीत. 

3. स्पर्धकांनी आपली चारोळी फक्त व्हाट्सएप ग्रुपवर पाठवी इतरत्र कुठेही पाठवू नये. इतरत्र पाठविलेले साहित्य स्वीकारल्या जाणार नाहीत. व्हाट्सएप ग्रुपची लिंक नाव नोंदणी केल्यानंतर देण्यात येईल.

4. स्पर्धकांनी आपली चारोळी टंकलिखित (टेक्ट स्वरूपात) करूनच पाठवावी. पीडीएफ अथवा वर्ड फाईल स्वीकारल्या जाणार नाही. 

5. जातीय भावना वाढीस लागतील, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचेल असे कुठलेही संकेत चारोळीत नसावे. 

6. चारोळी पाठवितांना सर्वात वर ‘‘मराठी साहित्य वार्ता’’ आयोजित ‘‘महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार - 2020’’ चारोळी लेखन स्पर्धा असा उल्लेख असावा. 

7. आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चारोळीच्या खाली द्यावा. 

8. चारोळी पाठवितांना ती स्वलिखित असल्याची नोंद सर्वांत शेवटी करणे बंधनकारक राहील.  

नावनोंदणी करण्यासाठी 9595892542 या गुगल पे/फोन पे नंबर नोंदणी शुल्क भरून करावी. त्यानंतर फी भरल्याचा स्क्रिनशाॅट 9595892542 या नंबरवर पाठवावा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या