अविनाशने फुले-आंबेडकरी चळवळ ख-या अर्थाने डोळस केली - अर्जुन डांगळे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अविनाशने फुले-आंबेडकरी चळवळ ख-या अर्थाने डोळस केली - अर्जुन डांगळे

Avinash Dolas strengthens Phule-Ambedkar movement - Arjun Dangle


मराठी साहित्य वार्ता

चळवळ म्हणजे केवळ मोर्चे काढणे, निदर्शने करणे, आंदोलन करणे, अटक होणे, निवडणुका लढवणे एवढेच नाही तर आंबेडकरी चळवळीची लढाई ही मूल्य संवर्धनाची लढाई आहे. जीवनमूल्य जोपासण्याची लढाई आहे. आणि या मूल्य परिवर्तनाच्या लढाईमध्ये अविनाशने फुले-आंबेडकरी चळवळ ख-या अर्थाने डोळस केली, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक तथा अभ्यास अर्जुन डांगळे यांनी केले. ते प्रा. अविनाश डोळस फाउंडेशन आणि मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टल, युट्युब चॅनल, फेसबुक पेज आयोजित ‘‘प्रा. अविनाश डोळस यांचे फुले-आंबेडकरी चळवळीतील योगदान’’ या विषयावरील व्याख्यानातुन बोलत होते.  

पुढे बोलतांना डांगळे म्हणाले की, अविनाश डोळस यांना वाड्.मयीन शिष्टाचाराचा अभ्यास होता. साहित्यिक, संपादक, अभ्यासक आणि कार्यकर्ता ते नेता अशा विविध भूमिका त्यांनी एकाच वेळी निभावल्या होत्या. तो सर्वांना सामावून घेणारा सच्चा मित्र होता. परिवर्तनवादी संवेदनशिल असलेला नेता, कलावंत होता. त्यांच्याकडे एक वैचारिक बैठक होती. राजकारण, समाजकारण, धम्म, सांस्कृतिक, साहित्य, नाट्य, समीक्षा, आंतराष्ट्रीय घडामोडी, पत्रकारिता, थिएटर, कथा, वैचारिक लेखन असा एकही विषय नाही की ज्याला अविनाश डोळस यांनी स्पर्श केला नसेल. त्यांच्या जाण्याने चळवळीची मोठी हानी झाली आहे. 

मराठी साहित्य वार्ताच्या युट्युब चॅनलवर लाईव्ह झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अविनाश डोळस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डाॅ. संजय मून यांनी केले. त्यानंतर पाहुण्यांचा परिचय प्रा. डाॅ. उत्तम अंभोरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. डाॅ. प्रज्ञा साळवे यांनी मानले. यावेळी डाॅ. वाल्मिक सरोदे, डाॅ. महेंद्र भवरे, डाॅ. गंगाधर अहिरे, डाॅ. देवेंद्र उबाळे, डाॅ. मधुकर खंदारे, डाॅ. क्षमा खोब्रागडे, सिद्धार्थ आल्टे, अनील खडतरे, प्रा. डाॅ. किशोर साळवे, प्रा. प्रकाश सिरसाट, प्रा. भारत सिरसाट आदींसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या