जाती आधारित वस्त्यांचे नाव बदलणे हा जातीअंताचा वांझोटा प्रयोग - पँथर दिपक केदार

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जाती आधारित वस्त्यांचे नाव बदलणे हा जातीअंताचा वांझोटा प्रयोग - पँथर दिपक केदार

Changing the name of a caste based settlement is a Sterile experiment of caste annihilation - Panther Deepak Kedar


Social24Network

जातीवर आधारित वस्त्यांचे नावे जातीसहित आम्ही 1956 लाच गाळून टाकलेत. महाराष्ट्र सरकार जातीवर आधारित वस्त्यांचे नावे बदलणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेकडो दलित हत्याकांड झाले त्यावर न बोलणारे जातीअंताच वांझोटा ढोंग करत आहेत. जातीअंताला पर्याय बौद्ध धम्म आहे. बौद्ध धम्मात मानवता हीच एकमेव जात आहे. मानवतावाद रुजवण्यासाठी बौद्ध धम्म अंगीकारायला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखी अफाट परिवर्तनवादी इच्छाशक्तीची गरज आहे. याआधी शिवधर्म प्रयोग झाला तो ही धर्ममार्तंडापुढे फोल गेला. बौद्ध धम्म येथील पूर्वाश्रमीचे महार यांनी मोठ्या प्रमाणात अंगीकारला म्हणून बौद्ध धम्माचा तिटकारा करायचा आणि नवा पर्याय काढायचा ही सुद्धा जातीयता होती. शिवधर्म रुजवु पाहणाऱ्यांना बौद्ध धम्माची दीक्षा घेतली असती तर जातीच्या नायनाटाचा मोठा अजेंडा सुरू झाला असता. बौद्ध धम्मातच रयतेचे हित असलेला शिवधर्म आहे एवढं साधं गणित यांना कळलं नाही हे दुर्दैव आहे.
 

राजर्षी शाहू महाराज काही काळ असते तर महाराष्ट्रातून जात हद्दपार झाली असती. सामाजिक आर्थिक गुलाम केलेल्या वर्गाचा कणवळा असलेला राजा ज्याच मन जिवंत होतं. त्यांना शोषित, पीडित घटकांचं सामाजिक  आर्थिक दारिद्र स्वस्त बसू देत नव्हतं म्हणूनच ते बाबासाहेबाना साथ देत होते. आजचे स्वयंघोषित "जाणता" हे घराणेशाहीला बळ देणारे आहेत. एका जातीची कर्मठता जिवन्त ठेऊन, जातीच्या बळावर मताच राजकारण करून सत्ता मिळवून ती 169 कुटुंबाने वाटून खायची हे आजचे असंवेदनशील "जाणता" आहेत. सामाजिक आर्थिक गुलामीत वावरत असलेल्या जातीला जात नको आहे तर ज्यांना जातीमुळे घराणेशाही टिकवता येते, सत्ता लाटता येते त्यांना जात प्यारी आहे. तिचं अस्तित्व कर्मठ करून सत्तेचा मलिदा जातीच्या बळावर खाणे हा एककलमी जाहीरनामाच आजच्या सत्ताधाऱ्यांचा आहे. जातीअंताच्या अजेंड्यासाठी अफाट इच्छाशक्ती हवी ती आजच्या कुणाकडेही नाही. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ती होती त्यानंतर कुणीही येते निर्माण झाले नाहित आणि होणारही नाहीत.

वस्त्यांचे नावं बदलून काय होणार? ज्यानी जीआर काढला त्यांनी तरी स्व:जातीयतेची कर्मठता सोडली का? पक्षाच्या झेंड्याचा रंग धर्म आधारित असतो त्यांच्याकडून जातीअंताची किती अपेक्षा करायची? शेकडो हत्याकांड जातीमुळे वर्षभरात घडले यावर मुख्यमंत्री गृहमंत्री बोलले नाहीत. जणू काही दलितांच्या मुळावर वर्षपूर्ती जल्लोष सुरू आहे. गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात अरविंद बन्सोड हत्याकांड घडलं, 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आजवर तिकडं गृहमंत्री फिरकले नाहीत.  सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री यांच्या मतदारसंघात सर्वात जास्त जातीय अत्याचार घडले हे त्यांना चांगलं माहित आहे. स्वाधार योजनेचे पैसे दिलेले नाहीत, समताधुतांचे पैसे दिलेले नाहीत, बार्टीची फिलॉशिप दिलेली नाही, घरकुल निधी नाही, अट्रोसिटी ऍक्ट पीडितांना त्यांचा निधी दिला जात नाही, शिष्यवृत्तीचे तीन तेरा झाले आहेत. जात बघून समाजीक न्याय देणारे जाती आधारित वस्त्यांचे नावं बदलुन काय मिळवणार आहेत?  

उपमुख्यमंत्री हे जातीला बघून न्याय देतात त्यांच्या दृष्टीतून स्वजात विकास हा सामाजिक न्याय आहे. सारथीला तात्काळ निधी तर बार्टीला वंचित हा जातीयवाद नाही का? जातीच्या पगड्या घालून मत मिळवणारे त्या जातीच्या सामाजिक आर्थिक उन्नतीच्या योजना ठप्प करत असतील तर ही नौटंकी आहे. नौटंकी हाच अजेंडा असेल तर चांगला निर्णय आहे म्हणू परंतु परिवर्तनाच हे आधुनिक ढोंग आहे यापलीकडे काहीही नाही. जातीवर आधारित वस्त्यांचे नाव बदलणे हा जातीअंताचा वांजुठा प्रयोग आहे. बौद्ध धम्म हाच जातीच्या अंताचा अंतिम पर्याय आहे. तो पर्याय अंगिकारण्यासाठी दृढ इच्छाशक्ती हवी तेवढी क्षमता देशात कुणाकडेच नाही. जाती धर्माला चिटकलेले ढेकूण परिवर्तन करू शकत नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या