Join the movement against the anti-farmer policy of the government
Social24Network
शेतकऱ्यांना पण याचं पद्धतीने हाताळण्यात आले. पण पंजाब-हरियाणा येथील बहुसंख्येने शेतकरी हा शीख समाजाचा आहे, तो हिंदू धर्मातील घटक नाही. म्हणूनच तो पेटून उठला. आणि इथेच मोदी सरकारचा सर्व गेम फसला. हिंदू धर्मातील सहा हजार सहाशे जातीनां दलित मुस्लिम समाजाच्या विरोधात लढवून दंगली घडविता आल्या पण शीख समुदाय शेतकरी म्हणून एवढ्या मोठ्या शक्तीने संघटित पणे संघर्षासाठी तयार होईल हे मोदीच काय कोणीच अपेक्षा केली नव्हती. म्हणूनच नवीन कृषी विधेयकांना होणारा हा विरोध जागतिक पातळीवर लक्षवेधी ठरला आहे. हिंदू मुस्लिम दंगली घडविणाऱ्यांना, कामगार कर्मचाऱ्यांना बेदखल करणाऱ्यांना या शेतकऱ्यांनी कोंडीत पकडले असे वाटत असतांना गोदी मीडिया व त्यांचे कलम कसाई बुद्धिजीवी आयटी सेल बुद्धिभेदी डिजिटल इंडियाचा वापर करून मोदी सरकारचा हा ऐतिहासिक कायदा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नशीब कसे बदलेल यांची अभ्यासपूर्ण खोटी आकडेवारी दाखवीत आहेत. शेतकऱ्यांचे नशीब कसे बदलेल तर शेतकरी कुठेही जाऊन त्याच उत्पादन विकू शकेल. म्हणजे आता पर्यत शेतकरी आठवडा बाजारात त्यांचा शेतीमाल विकत नव्हता काय? कृषीउत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे कमी आणि राजकिय पक्षाचे सफेद कडक इस्त्रीचे कपडे घातलेले प्रतिनिधी जास्त आहेत. ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व कमी आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व जास्त करतांना उगडपणे दिसतात. कारण शेतकरी पक्षांना आर्थिक निधी देऊ शकत नाही, पण व्यापारी न चुकता मोठा पक्षनिधी सर्व कार्यक्रमासाठी सढळ हस्ते देत असतो. म्हणूनच शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करण्यासाठी सरकार मान्य व्यापारी व प्रतिनिधी आघाडीवर असतात. म्हणूनच बहुसंख्य शेतकरी आपला शेतीमाल बाजार समितीच्या बाहेरच विकत असतो, त्या शेतकऱ्यांना आज पर्यत कोणी रोखले नाही. कुठलाही सरकारी नियम त्या शेतकऱ्यांना तसं करण्यापासून अडवत नाही. मग हे विधेयक शेतकऱ्यांचे कोणते नशीब बदलणार आहे.
सरकारने शेतकऱ्यांचा माल खरेदी करून शासकीय गोडाऊन मध्ये ठेवला पाहिजे, प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांच्या संख्येनुसार साठवण करण्यासाठी गोडाऊन उपलब्ध पाहिजेत. आलू, कांदा, डाळी, अन्नधान्य, खाद्यतेल बिया साठवून ठेवता येतील. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देऊन महागाई वर नियंत्रण ठेवता येईल. पण तसे धोरण न राबविता साठेबाजांना फायदा होईल असे धोरण सर्वच सरकारी प्रशासकीय यंत्रणेने वापरलेले आहे. साठेबाज व्यापारी ते या वस्तूंचा साठा करून ठेवतात आणि जेव्हा शेतकरी माल विकायला बाजारात आणतात तेव्हा भाव पडले जातात. निवडणूक जाहीरनाम्यात प्रत्येक पक्ष शेतकऱ्यांना आश्वासन देते आमचे सरकार आले तर किमान आधारभूत किंमत (हमीभाव) देणार. आज पर्यंत तशी अंमलबजावणी करण्यात आली काय? म्हणूनच शेतकऱ्यांना आश्वासन नको. विधेयकात तसं लिहा की माल खरेदी करणाऱ्याला तो किमान आधारभूत किमतीच्या खाली विकत घेता येणार नाही.
मोदी सरकारने पंजाब हरियाणा राज्यात अदानी, अंबानी ला शंभर एकर जमीन साठवण करण्यासाठी गोडाऊन बांधण्यासाठी दिली तेव्हा याचं शेतकऱ्यांनी आंदोलने केली होती. प्रायव्हेट कंपन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर स्वतःच मार्केट लावू शकतील. यांची व्यवस्था अगोदर करून ठेऊन सरकार जिथे कुठलाही कर (टॅक्स) आकारला जाणार नाही. परिणामी शेतकऱ्यांना जास्त किंमत मिळेल. असे सरकार कोणत्या उपाय योजने नुसार सांगते. म्हणजेच शेतकऱ्यांना सुरुवातीला या कंपन्या जास्त भाव देतील त्यामुळे शेतकरी त्यांचा माल या प्रायव्हेट कंपन्यांना विकेल. परिणामतः कृषी उत्पन्न बाजार समित्यांची व्यवस्था मोडकळीस येईल. त्या बंद पडतील. एकदा त्या बंद पडल्या की प्रायव्हेट कंपन्या मालाला योग्य भाव देणार नाहीत. कारण त्यांना हमीभाव देणे बंधनकारक नसणार. त्या विरोधात आजच्या सारखे मोर्चे आंदोलने करता येणार नाहीत. कृषी उत्पादन आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक २०२०, भाग २:४ (३) अनुसार, अशा करारांतर्गत उत्पादन खरेदी करणाऱ्या खरेदीदाराला जास्तीत जास्त ३ दिवसात शेतकऱ्याचे पैसे द्यावे लागतील. अशी क्षमता या देशात फक्त काही मोजक्याच लोकांकडे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत competition आपोआपच कमी होईल.
परिणामतः भाव कमी मिळेल. त्यात सुद्धा काही वाद झाला तर शेतकरी ती तक्रार केस उपविभागीय दंडाधिकारीकडे न्यायनिवाड्यासाठी जातील तिथे अगोदरच खूप केसेस पडून असल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी चकरा माराव्या लागतील. तिथे कंपन्यां कडून कायदेशीर बाजू समजाऊन सांगायला मोठे मोठे वकील असतील आणि कर्मचारी अधिकारी शेतकऱ्यांना अशिक्षित समजून एकटे पडतील, आज ही असेच सुरू आहे. जे उद्योगपती प्रधानमंत्री हाताळतात त्यांना सरकारी व्यवस्था कशी हाताळायची हे शिकवण्याची गरज नाही. यांची पूर्णपणे जाणीव झाल्यामुळेच पंजाबी हरियाणा राज्यातील शेतकरी पूर्ण शक्तीने संघर्ष करण्यासाठी उतरला आहे. तो शीख समुदाय अल्पसंख्यांक आहे असे सांगून त्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न विविध पातळीवर होत आहे. देशातील सर्वच शेतकऱ्यांनी आपली जात, धर्म विसरून सहभागी झाले पाहिजे या आंदोलनाला पाठींबा दिला पाहिजे. मोदी सरकारची हुकूमशाही गाडली पाहिजे त्याशिवाय शेतकरी, कामगार,कर्मचारी यांना पर्याय नाही. तुम्ही हिंदू जरी असला तरी शेतकरी, मजूर, कामगार कर्मचारी ही तुमची ओळख भविष्यात गुलाम म्हणून होणार यासाठी मोदी सरकारच्या ध्येय धोरणा विरोधात शीख शेतकऱ्यांनी मोठीच गोची करून ठेवली. त्यात सहभागी व्हा, पाठिंबा द्या.



0 टिप्पण्या