The procession will be taken out from the donkey - Panther Deepak Kedar warns the Minister of Social Justice
महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या आडून अनुसूचित जाती-जमातीचा निधी वळवून स्वःजात विकास साधत आहे. घरकुलसाठी सरकारकडे पैसे नाहीत, बार्टीची फिलोशिप देण्यासाठी पैसे नाहीत, थकीत शिष्यवृत्ती देण्यासाठी पैसे नाहीत, म. फुले, संत रोहीदास महामंडळांना निधी नाही, मात्र सरकारकडे आमदारांचे पगार, अधिका-यांचे पगार द्यायला पैसे आहेत. स्वःजातीच्या विद्यार्थ्यांचा विकास व्हावा म्हणून सरकारने बार्टीचा निधी सारथी संस्थेकडे वळवला आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आता आम्ही परात द्यायला आलो आहोत कारण आमचा सगळा निधी यांनी खावून टाकला आहे. आता उरलेल्या आमची ताटंसुद्धा त्यांनी मोळून खावित, विकून खावीत. पण याद राखा आज आम्ही परात घेवून आलो आहोत उद्या तुमची गाढवावरून वरात काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे. पुणे येथे आयोजित सामाजिक न्याय मंत्र्यांना परात भेजो आंदोलनात ते बोलत होते.
पुढे बोलतांना केदार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार वर्षपूर्ती साजरी करीत आहे. महाराष्ट्रामध्ये आठ महिन्यामध्ये शेकडो हत्याकांड घडले. एकाही हत्याकांडामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टच्या पिडितांना न्याय मिळालेला नाही त्यांच्या हक्काचा निधी मिळालेला नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभं केलेले आहे. स्वाधार योजनेचे पैसे दिलेले नाहीत. शिष्यवृत्तीचे पैसे दिलेले नाहीत. बार्टीची फिलोशिप दिलेली नाही. संविधान मूल्य रूजविणा-या समतादूतांचे मानधन दिलेले नाही. कोरोनाच्या आडून सामाजिक न्यायाचा निधी वळविल्या जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार एक जातीय अजेंडा घेवून चालले आहे. स्वः जात विकासवाद हे सरकारचे धोरण आहे. बार्टीचा 7 करोड 94 लाख निधी सारथी संस्थेला वळविला. आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे केले आहे. घरकुल योजनेला निधी नाही. महात्मा फुले विकास मंडळाला निधी नाही. अण्णाभाउ साठे महामंडळाला निधी नाही. रोहिदास महामंडळाला निधी नाही. सामाजिक न्याय मंत्री हे सामाजिक अन्याय मंत्री झाले आहेत.
सामाजिक न्याय मंत्री अनुसूचित जाती/जमातीचाच असावा...
सामाजिक न्याय मंत्री कदाचित अनुसुचित जाती जमातीचे नसल्यामुळे त्यांच्या डोक्यात जातीयवाद आहे. याच मानसिकतेतुन त्यांनी एससी/एसटीचा निधी वळवून अन्याय केला आहे. याचा निषेध म्हणून ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर परात भेजो आंदोलन पुकारले आहे. तुम्ही आमचा सामाजिक न्यायाचा निधी लुटुन खायला लागला आहात. त्यामुळे आमच्याकडे नुसत्या पराती शिल्लक आहेत त्या पराती आम्ही तुम्हाला भेट द्यायला आलो आहोत. या पराती विकुन खाता येतात का? ते बघा. कोरोनाच्या आडून निधी नसल्याचा बनाव केल्या जातो मात्र अधिकारी पगार वेळेवर घेतात, त्यांच्या पगारासाठी पैसे आहेत मात्र दलित/बहुजन समाजाच्या विद्याथ्र्यांसाठी पैसे नाहीत. ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत पिडिताला पैसे नाहीत. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री हा अनुसूचित जाती/जमातीचाच असावा अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेने केली आहे.
सरकारविरोधात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही...
फुले-शाहु-आंबेडकरांचे नाव घेवून सत्तेत यायचं आणि त्यांच्याच वारसदारांचे निधी वळवून त्यांच्यावर अन्याय करायचा ही नीती आता बहुजन समजाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे बहुजन समाजामध्ये तीव्र नाराजीचा स्वर आहे. परिस्थिती अशीच कायम राहीली तर सामाजिक न्याय मंत्र्याच्या विरोधात बहुजन समाजाच्या नाराजीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. म्हणून अनुसुचित जाती जमातीचेच सामाजिक न्याय मंत्री असले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. आज परात घेवून आलोय उद्या गाढवावरून वरात काढल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा केदार यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या