मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
औरंगाबाद (प्रतिनिधी) - निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक 14 जानेवारी गुरुवार रोजी सकाळी 10:30 वाजता, मौलाना आझाद संशोधन केंद्र टी. व्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाट्क सरसेनानी आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना, मुंबई) हे असणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आर. कॆ. क्षीरसागर (निवृत्त, प्राचार्य डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद) हे असणार असून प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे (आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, समीक्षक तथा विचारवंत औरंगाबाद) हे प्रमुख वक्ते असणार आहे. प्रमुख पाहुणे शिवानंद टाकसाळे,(मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद परभणी),एन. डी. जीवने (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते), इंजि. राजधर दांडगे (कवी गायक, सामाजिक कार्यकर्ते औरंगाबाद) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या प्रसंगी महाराष्ट्रातुन उल्लेखनीय काम काम करणाऱ्या ५० गुणिजनांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी कोरोना संबधी पूर्ण खबरदारी म्हणून संपूर्ण हॉल सॅनिटाइजेशन केले जाणार असून मास्क शिवाय या कार्यक्रमासाठी प्रवेश दिला जाणार नाही. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रतनकुमार साळवे यांनी केले आहे.


0 टिप्पण्या