Arrest Sambhaji Bhide immediately; All India Panther Sena offensive
ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रमुख दिपक केदार हे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र भर दौरे करीत आहे, ते आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. संभाजी भिडे यांनी भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी तात्काळ अटक करा असा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मिरज दंगलीच्या वेळी स्वर्गवासी आर.आर.पाटील यांनी वाचवले, आणि आता भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख वाचवत असल्याचा आरोप दिपक केदार यांनी केला. तसेच भीमा कोरेगाव दंगली प्रकरणातून दाखल चार्ट शिट मधून संभाजी भिडे यांचे नाव वगळण्यात आले आहे. ह्या घटनेचा निषेध देखील दिपक केदार यांनी व्यक्त केला. ही महविकास आघाडी नसून भिडे हस्तक आघाडी आहे. असा गंभीर आरोप देखील दिपक केदार यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
औरंगाबाद नामांतरावर दिपक केदार यांनी बोलताना सांगितले की, निवडणुका तोंडावर आल्या की औरंगाबाद नामांतराचा विषय आठवतो. इतिहास वाचवायचा असेल तर औरंगाबाद नाव असणे आवश्यक आहे. औरंगाबाद चे नामांतर करण्यापेक्षा पुण्याचे नामांतर छत्रपती संभाजी महाराज नगर करा. तसेच शिंदखेडराजा गावाचे नाव जिजाई नगर करा अशी मागणी देखील ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रमुख दिपक केदार यांनी केला.


0 टिप्पण्या