अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट पीडितांचा निधी सरकार मंत्र्यांचे बंगले बांधण्यासाठी वापरत आहे...? ; पॅंथर दीपक केदार

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट पीडितांचा निधी सरकार मंत्र्यांचे बंगले बांधण्यासाठी वापरत आहे...? ; पॅंथर दीपक केदार

The government is using the funds of the Atrocities Act victims to build the bungalows of the ministers ...? ; Panther Deepak Kedar





Social24Network


समग्र महाराष्ट्रातील अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट पीडितांना त्यांच्या हक्काचा निधी गेल्या मार्चपासुन देण्यात आलेला नाही. ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातुन या विरोधात पुण्यात परात भेजो आंदोलन झाल्यानंतर सरकारला जाग आली. सरकारने कोरोनाच्या नावाखाली पीडितांचा निधी थांबविला, विद्याथ्र्यांना स्वाधार योजनेचे पैसे दिले नाही, घरकुलांचे पैसे दिले नाही, शिष्यवृत्तीचे पैसे दिले नाही. हा वंचित बहुजन घटकाचा हक्काचा पैसा द्यायला सामाजिक न्याय विभागाकडे पैसे नाहीत परंतु मंत्र्यांचे बंगले बांधायला सरकारकडे निधी आला असा? असा संतप्त सवाल ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केला आहे. 


आज बीड येथे सामाजिक न्याय आयुक्तांना पॅंथर दीपक केदार यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी सामाजिक न्याय विभागावर तीव्र शब्दात टीका केली. ते म्हणाले की, सामाजिक न्याय मंत्री जातीय मानसिकतेतुन निधी देत नाहीत. निधी नसतील तर अधिकारी कशासाठी बसवले आहेत. वास्तविक पाहता अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना सरकारच्या वतीने तात्काळ निधी दिल्या जातो परंतु गेल्या वर्षभरापासुन हा निधी वाटप करण्यात आला नाही. फुले-शाहु-आंबेडकरांचे नाव घेवुन सत्ता मिळवायची आणि त्यांच्याच विचारांवर चालणा-यांवर अत्याचार करायचे ही मनुवादी विचारसरणीची जातीय मानसिकता आता आमच्या लक्षात आलेली आहे. 


केदार पुढे म्हणाले की, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट 130 पीडितांना गेल्या वर्षभरापासुन निधी दिल्या गेला नाही. हा निधी जवळजवळ 3 कोटीच्या आसपास आहे. आठ दिवसाच्या आत हा निधी वितरीत झाला नाही तर सर्व पीडित आणि ऑल इंडिया पॅंथर सेनेचे कार्यकर्ते राज्यभरात तीव्र आंदोलन उभे करतील याची सरकारने नोंद घ्यावी. राज्यातील समाजकल्याण आयुक्तांना आवाहन करतांना केदार म्हणाले की, राज्यातील समाजकल्याण आयुक्तांनी स्वतःमधील मानवता जागृत करून पीडितांना न्याय मिळावा, त्यांना त्यांच्या हक्काचा निधी मिळावा यासाठी मंत्र्याविरोधात भुमिका घ्यावी आणि पीडितांना त्यांचे अधिकार मिळवुन द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या