सिंदखेड राजाचे जिजाईनगर नामांतर करा ; पॅंथर दीपक केदार

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सिंदखेड राजाचे जिजाईनगर नामांतर करा ; पॅंथर दीपक केदार

Rename Jijainagar of Sindkhed Raja; Panther Deepak Kedar



Social24Network

छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणा-या, रयतेचे राज्य निर्मात्या माता जिजाई यांची जन्मभूमी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा गावाला जिजाईनगर नाव द्या अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पॅंथर दीपक केदार यांनी सरकारकडे केली आहे.

यासंदर्भात केदार म्हणाले की, सिंदखेडराजा ही रयतेचे राज्य निर्मात्या माता जिजाईची जन्मभूमी आहे. जिजाई यांच्या इतिहासाचा मागोवा घेऊन त्यांच्यावर मोठं लिखाण होणं गरजेचं आहे. बहुजनांचे रयतेचे राजे शेतकरी, बहुजन, शेतमजूर, शोषित, पीडित, मुस्लिम सर्व समाजघटकांचे राजा पुढे न येऊ देता एका धर्माच्या चौकटीत कर्मठरित्या बसवण्याचा खेळ ब्रह्माणवाद्यांनी सुरू केलेला आहे. त्याच प्रवृत्ती माता जिजाईचा खरा इतिहास पुढे येऊ देत नाहीत. माता जिजाईचा खरा इतिहास पुढे आणण्यासाठी इतिहासकाने संशोधन करून माता जिजाईच्या इतिहासाला झळाली दिली पाहिजे. 

यासंदर्भात तात्काळ सरकारने भुमिका घ्यावी अन्यथा जनआंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पॅंथर दीपक केदार यांनी दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या