क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आज दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती गांधीभवन शहागंज औरंगाबाद येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी औरंगाबाद काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष हीशाम उस्मानी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा सांगितला. तसेच शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी केलेल्या कार्याचा आढावा सांगितला व स्त्रियांनी जागरूक होऊन समाज कार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला एम ए अजहर भाई, किशोर सरोदे, शिरीष चव्हाण, किसन साळवे, सुनील साळवे, आनंद भांबरे, अमोल सरदार, दिलीप गोसावी, डॉ धम्मपाल वाघ, अशोक चक्रे, रोहित तायडे, वैशाली तायडे, शकुंतला साबळे, घोरपडे मावशी, शकुंतला दिवेकर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन जयपाल दवणे यांनी केले तर आभार सुनील पांडे यांनी मानले.


0 टिप्पण्या